समन्वय ठेवून आचारसंहिता पाळावी
By Admin | Updated: September 13, 2014 23:04 IST2014-09-13T23:03:31+5:302014-09-13T23:04:42+5:30
हिंगोली : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्याने जिल्ह्यात तत्काळ आचारसंहिता लागू झाली.

समन्वय ठेवून आचारसंहिता पाळावी
हिंगोली : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्याने जिल्ह्यात तत्काळ आचारसंहिता लागू झाली. त्यात सर्व विभागप्रमुखांनी योग्य समन्वय ठेऊन आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी केले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शनिवारी सर्व विभागप्रमुखांची बैठक झाली. यावेळी सीईओ पी.व्ही. बनसोडे, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र परळीकर, खुदाबक्ष तडवी, अनुराधा ढालकरी, लतिफ पठाण उपस्थित होते. न.प, जि.प, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील जागेवर पोस्टर्स, बॅनर्स त्वरित काढून त्याचा अहवाल आचारसंहिता कक्षप्रमुखांकडे द्यावा. सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान होणार याची दक्षता घ्यावी आणि विभाग प्रमुखांनी आचारसंहितेची स्वत:पासून अंमलबजावणी करून तिचा भंग होणार नाही, ही काळजी घेण्याचे आवाहनही कासार यांनी केले.
पोस्टर्सवरील लोकप्रतिनिधींची नाव दिसू नये, पदाधिकाऱ्यांचे शासकीय वाहने काढून घ्यावे, रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करावा, धार्मिक स्थळे, शासकीय विश्रामगृहांचा वापर राजकीय कारणासाठी करू नये, खाजगी वाहने, सभा, हेलिकॉप्टर वापरण्याच्या परवानगीबाबत गगरांनी यांनी मार्गदर्शन केले. आचारसंहिता भंग होत असेल तर कक्षासी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)