सराफांनी पाळला कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:40 IST2017-09-14T00:40:08+5:302017-09-14T00:40:08+5:30
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सोनार समाजातील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करणाºया नराधमाला कडक शिक्षा करावी, या मागणीसाठी बुधवारी सराफा दुकाने बंद ठेऊन सराफा असोसिएशन व सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले़ दरम्यान, कामगारमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनाही निवेदन देण्यात आले़

सराफांनी पाळला कडकडीत बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सोनार समाजातील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करणाºया नराधमाला कडक शिक्षा करावी, या मागणीसाठी बुधवारी सराफा दुकाने बंद ठेऊन सराफा असोसिएशन व सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले़ दरम्यान, कामगारमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनाही निवेदन देण्यात आले़
गेवराई तालुक्यातील सोनार समाजातील अल्पवयीन मुलीवर २५ आॅगस्ट रोजी गुन्हेगार विकास देवकते याने लैंगिक अत्याचार केला होता़ या घटनेचा निषेध सराफा असोसिएशनच्या वतीने करण्यात आला़
नांदेड शहरातील सराफा दुकाने आज दिवसभर बंद ठेवण्यात आली़ जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे, सरकारी वकील म्हणून अॅड़ उज्ज्वल निकम यांची निवड करावी, पीडित मुलीस शासनाकडून सर्व प्रकारची मदत मिळावी, पीडित मुलीच्या कुटुंबीयास पोलिस संरक्षण द्यावे, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या़
यावेळी अच्युत जगताप, पांडुरंग येरावार, रूपेश टाक, अंकुश शहाणे, मणजित विंचूरकर, सुधीर शहाणे, सोमेश राजूरकर, शैलेश बोकन, विलास पुजारी, सुजित काबरा, अमोल टाक, अक्षय शेवडकर आदी उपस्थित होते़