शनिवारी, रविवारी संपूर्ण बाजारपेठ उघडी ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:04 IST2021-06-29T04:04:41+5:302021-06-29T04:04:41+5:30

औरंगाबाद : जिल्हा व्यापारी महासंघाने सोमवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेत दुकानांच्या वेळा बदलणे, शनिवारी, रविवारी संपूर्ण ...

Keep the entire market open on Saturdays and Sundays | शनिवारी, रविवारी संपूर्ण बाजारपेठ उघडी ठेवा

शनिवारी, रविवारी संपूर्ण बाजारपेठ उघडी ठेवा

औरंगाबाद : जिल्हा व्यापारी महासंघाने सोमवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेत दुकानांच्या वेळा बदलणे, शनिवारी, रविवारी संपूर्ण बाजारपेठ उघडी ठेवण्याची मागणी केली. यावर पालकमंत्र्यांनी दुकानांच्या वेळा बदलता येणार नाहीत, परंतु शनिवार-रविवार बाजारपेठ उघडण्याबाबत विचार करता येईल, असे सूचक वक्तव्य केले.

जिल्हा व्यापारी महासंघातर्फे पालकमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. तसेच नव्याने लावण्यात येणाऱ्या आस्थापना कर (शॉप ॲक्ट) याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी आ. अंबादास दानवे उपस्थित होते. निवेदन देताना जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, अजय शहा, तनसुख झंबड, लक्ष्मीनारायण राठी, विजय जयस्वाल, जयंत देवळाणकर, मंगल पटेल, गुलाम हक्कानी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.

फोटो ओळ...

पालकमंत्री सुभाष देसाई यांना निवेदन देताना जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे. यावेळी आ. अंबादास दानवे आदी.

Web Title: Keep the entire market open on Saturdays and Sundays