कुंडलवाडीच्या नगराध्यक्षपदी कवडेकर
By Admin | Updated: August 17, 2014 00:54 IST2014-08-17T00:39:00+5:302014-08-17T00:54:00+5:30
कुंडलवाडी : कुंडलवाडी नगराध्यक्षपदी गंगामणी पिराजी कवडेकर यांची तर उपनगराध्यक्षपदी प्रकाश अर्जुने यांची निवड झाल्याची घोषणा निर्वाचन अधिकारी प्रवीणकुमार धर्मकर,जी.एम. इरलोड, एस.एस. पटेल यांनी केली.

कुंडलवाडीच्या नगराध्यक्षपदी कवडेकर
कुंडलवाडी : कुंडलवाडी पालिका नगराध्यक्षपदी गंगामणी पिराजी कवडेकर यांची तर उपनगराध्यक्षपदी प्रकाश अर्जुने यांची निवड झाल्याची घोषणा निर्वाचन अधिकारी प्रवीणकुमार धर्मकर,जी.एम. इरलोड, एस.एस. पटेल यांनी केली.
१६ आॅगस्ट रोजी नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता निवडणूक घेण्यात आली. या दोन्ही पदासाठी एकमेव अर्ज असल्याने ही निवड बिनविरोध पार पडली. येथील पालिकेत पूर्ण काँग्रेसचे सतरा नगरसेवक असून पुढील अडीच वर्षे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. पक्षश्रेष्ठींनी अध्यक्षपदासाठी गंगामणी पिराजी कवडेकर व उपाध्यक्षपदासाठी प्रकाश पाटील अर्जुने यांच्या नावाने बी फॉर्म बंद पाकिटात पाठविला़