काश्मीर जलप्रलयाचा फटका ट्रॅव्हल उद्योगाला

By Admin | Updated: September 13, 2014 00:35 IST2014-09-13T00:32:19+5:302014-09-13T00:35:39+5:30

औरंगाबाद : काश्मीरमध्ये जलप्रलयानंतर अजूनही लाखो पर्यटक अडकून पडले आहेत.

The Kashmir flood hit the travel industry | काश्मीर जलप्रलयाचा फटका ट्रॅव्हल उद्योगाला

काश्मीर जलप्रलयाचा फटका ट्रॅव्हल उद्योगाला

औरंगाबाद : काश्मीरमध्ये जलप्रलयानंतर अजूनही लाखो पर्यटक अडकून पडले आहेत. अडकलेले पर्यटक सुखरूप पोहोचावेत यासाठी शासकीय, निमशासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहे. अशा परिस्थितीत औरंगाबादेतील ट्रॅव्हल उद्योगाला जलप्रलयाचा मोठा फटका बसला आहे.
औरंगाबादहून काश्मीरला मोठ्या संख्येने पर्यटक जातात. काही भाविकही वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी जात असतात. पर्यटक आणि भाविकांमुळे औरंगाबादेतील ट्रॅव्हल उद्योगाला मोठा आर्थिक हातभार लागत असतो. वर्षभरात एका ट्रॅव्हल एजन्सीकडून किमान ३०० हून अधिक नागरिक ये-जा करतात.
शहरात काश्मीर आणि इतर पर्यटनस्थळांना जाण्यासाठी सुमारे २५ पेक्षा अधिक ट्रॅव्हल एजन्सी आहेत. अनेक एजन्सीधारक मुंबई, दिल्ली येथील मोठ्या एजन्सीधारकांशी कनेक्ट आहेत. वर्षभरात पाच हजारांहून अधिक भाविक, पर्यटक काश्मीरला जात असतात. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काश्मीरमधील अनेक शहरे पाण्यात बुडाली आहेत. पाणीपातळी कमी होण्यास तयार नाही. लाखो पर्यटक विविध हॉटेल्समध्ये अडकून पडले आहेत.
औरंगाबादेतील सहा पर्यटक बेपत्ता असल्याने त्यांचे कुटुंबीय आणि ट्रॅव्हल कंपन्या चिंतेत आहेत. या पर्यटकांशी संपर्क होत नसल्याने प्रशासनही चिंतातुर आहे. पावसाळ्यात किंवा बर्फवृष्टी होणाऱ्या दिवसांमध्ये काश्मीरला जाऊ नये, असा सल्ला ट्रॅव्हल कंपन्या पर्यटकांना देतात. काही पर्यटक हा सल्ला न ऐकता स्वत:च्या रिस्कवर जातात. काश्मीरमध्ये एप्रिल ते जून चांगले हवामान असते. या दिवसात जायला अजिबात हरकत नसते. हनीमुनसाठी अनेक जोडपे काश्मीरलाच प्राधान्य देतात. कुटुंबासह या दिवसांमध्ये जाणे योग्य असल्याचे ट्रॅव्हल कंपन्या सांगतात.
जम्मू-काश्मीर बँक
औरंगाबादेत जालना रोडवरील कुशलनगर येथे जम्मू- काश्मीर बँकेची शाखा आहे. या शाखेत काश्मीरशी आर्थिक व्यवहार करणारे ग्राहकच नाहीत. त्यामुळे बँकेच्या सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे मॅनेजर सिन्हा यांनी सांगितले.

Web Title: The Kashmir flood hit the travel industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.