शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

कशीश खून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा; शीख समुदायाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 16:38 IST

Kashish murder case फास्टट्रॅक कोर्टात खटला निकाली काढून आरोपीस कडक शिक्षा दिल्यास पुन्हा कोणी असा गुन्हा करण्यास धजावणार नाही, असे मत यावेळी शिष्ट मंडळाने व्यक्त केले.

औरंगाबाद: महाविद्यालय परिसरातील कॅफेसमोरून ओढत नेत एकतर्फी प्रेमातून तरुणीची गळा चिरून हत्या केल्याच्या घटनेने औरंगाबादसह संपूर्ण राज्य हादरले होते. या प्रकरणी शहरवासियांमध्ये संतापाच्या भावना आहेत. हा खून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी शिख समुदायाने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे आज केली.

देवगिरी महाविद्यालयात बीबीएच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या सुखप्रीत ऊर्फ कशीश कौर प्रीतपालसिंग ग्रंथी (१८) या विद्यार्थिनीची रचनाकार कॉलनीतील रिकाम्या प्लॉटमध्ये ओढत नेऊन २१ मे रोजी दुपारी गळा चिरून हत्या करण्यात आली होती. यामुळे शहरासह राज्य हादरून गेले होते. यावेळी अनेकांनी केवळ बघ्यांची भूमिका घेतल्याचेही पुढे आले आहे. शहरात अशा घटना होऊ नयेत म्हणून नागरिकांनी जागरूक राहावे. तसेच आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा द्यावी, यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा,अशी मागणी शीख समुदायाने आज जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनातून केली. फास्टट्रॅक कोर्टात खटला निकाली काढून आरोपीस कडक शिक्षा दिल्यास पुन्हा कोणी असा गुन्हा करण्यास धजावणार नाही, असे मत यावेळी शिष्ट मंडळाने व्यक्त केले.

काय आहे कशीश हत्या प्रकरण आरोपी शरणने दिलेल्या माहितीनुसार, तो कशीशवर मागील पाच वर्षांपासून एकतर्फी प्रेम करीत होता. दोघे एकमेकांना चांगले ओळखत होते. तो दहावी नापास झाल्यानंतर गॅरेजवर कामाला लागला. कशीशने बारावी पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयात बीबीएला प्रवेश घेतला. महाविद्यालयात ती मित्र-मैत्रिणींसोबत राहायची. शरणला त्याच्या मित्राने कशीशची मैत्री तीन मुलांसोबत जमली असून, तुला आता ती मिळणार नसल्याचे सांगितले. शनिवारी महाविद्यालयाच्या गेटबाहेरील एका कॅफेमध्ये कशीश तीन मित्र आणि मैत्रिणींसोबत कॉफी पिण्यासाठी गेली होती. तो मागेच आला. कशीशचे त्या तीन मुलांसोबत प्रकरण असल्याचा त्याला संशय होता. या संशयातूनच त्याने कशीशला शपथ घालून पाच मिनिटे बाेलायचे असल्याचा बहाणा करून कॅफेबाहेर बाेलावून घेतले. कशीश बाहेर आल्यानंतर त्याने तिच्यावर संशय व्यक्त केला. तेव्हा तिने त्यास नकार देत निघून जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्यामुळे त्याने तिला कॅफेसमोरच २०० फूट अंतरावर असलेल्या मोकळ्या प्लॉटच्या दिशेने ओढत नेले. माझी होऊ शकत नाहीस तर कोणाचीही होऊ देणार नाही, असे म्हणत सोबत असलेल्या हत्याराने तिच्यावर १८ वार केल्याची माहिती शरणने पोलिसांना दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय