शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

त्रासाकडे दुर्लक्ष करणे पडले महागात;कशीश हत्याकांडाच्या 'क्राईम सीन' मधून अनेक बाबींचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 15:25 IST

Kashish murder Case: महाविद्यालयीन विद्यार्थिनी कशीशचा २१ जून रोजी रचनाकार कॉलनीतील रिकाम्या प्लॉटमध्ये ओढत नेऊन शरणसिंग याने निर्घृणपणे खून केला होता.

औरंगाबाद : महाविद्यालयीन विद्यार्थिनी सुखप्रीत कौर ऊर्फ कशीशच्या हत्येचा क्राईम सीन शहर पोलिसांनी शुक्रवारी तयार केला. यामध्ये आरोपी शरणसिंग सेठी याने घटनेच्या दिवशी सकाळपासून तिचा पाठलाग केलेल्या घटनाही चित्रित केल्या आहेत. दरम्यान, आरोपीची पोलीस कोठडी संपल्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी शरणसिंगला न्यायालयात हजर केले असता, त्यास २ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डी. कुऱ्हेकर यांनी दिले.

महाविद्यालयीन विद्यार्थिनी कशीशचा २१ जून रोजी रचनाकार कॉलनीतील रिकाम्या प्लॉटमध्ये ओढत नेऊन शरणसिंग याने निर्घृणपणे खून केला होता. त्यास गुन्हे शाखा पोलिसांनी २२ जून रोजी लासलगावात अटक केली. न्यायालयाने सुरुवातीला त्यास २७ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली. ही मुदत शुक्रवारी संपत असल्यामुळे तपास अधिकारी निरीक्षक अविनाश आघाव यांनी आरोपीला न्यायालयात हजर केले. सहायक सरकारी वकील दत्तात्रय काठुळे यांनी अधिक तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. ही मागणी न्यायाधीशांनी मान्य केली. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस आयुक्तांनी निरीक्षक आघाव यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना केली आहे. ही एसआयटी अतिशय वेगवान पद्धतीने आरोपीच्या विरोधातील पुरावे जमा करीत आहेत. निरीक्षक आघाव, सायबरचे निरीक्षक गौतम पातारे, उस्मानपुऱ्याच्या निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांनी शुक्रवारी घटनास्थळावर घटनेच्या दिवशी घडलेला सीन तयार केला. आरोपी कशीशच्या पाठीमागे एकतर्फी कसा लागलेला होता. त्याविषयी आरोपीला घेऊन चित्रण केले. याशिवाय गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके, पवन इंगळे, अमोल म्हस्के, अजित दगडखैर यांच्यासह वेदांतनगरचे उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे हे गुन्ह्यातील विविध पुरावे जोडण्यासाठी काम करीत आहेत.

१५ पेक्षा अधिक जबाब नोंदवलेतपास पथकांनी गुन्ह्याशी संबंधित असलेल्या १५ पेक्षा अधिकजणांचे जबाब नोंदवले आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींनाही साक्षीदार करण्यात येणार आहे. तसेच आरोपीच्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून त्याची माहिती नोंदवली आहे.

आरोपीने हातावर गोंदवले नावआरोपी शरणसिंग याने एकतर्फी प्रेम करतानाच स्वत:च्या हातावर कशीश हे नाव गोंदवून घेतले होते. तसेच त्याने काही महिन्यांपूर्वी हातावर चाकूने वार करून कशीशला ब्लॅकमेल केल्याचेही समोर आले आहे.

दुर्लक्ष करणे पडले महागातआरोपी कशीशला अनेक महिन्यांपासून त्रास देत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. घटनेच्या दिवशीही त्याने विविध ठिकाणी तिच्यासोबत वाद घातला. या सर्व घटनांकडे कशीशने दुर्लक्ष केल्यामुळे आरोपीची हिंमत अधिक वाढली. कशीश आपली होऊ शकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने तिचा खून केल्याचे चौकशीत समोर आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू