शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कराटेच्या ब्लॅक बेल्ट चॅम्पियनची १७ वार करून क्रूर हत्या; २० जणांची कसून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 12:22 IST

विद्यार्थ्याच्या हत्येचे गूढ कायम, सायंकाळी ६:५५ वाजता मोबाईल झाला स्विच ऑफ

छत्रपती संभाजीनगर : उस्मानपुऱ्यातील म्हाडा कॉलनीत १९ वर्षीय प्रदीप विश्वनाथ निपटे या विद्यार्थ्याच्या हत्येचे गूढ बुधवारीदेखील कायम राहिले. कराटे, ज्युडोत प्रभुत्व असलेला प्रदीप ब्लॅक बेल्ट चॅम्पियन होता. तरीही त्याच्या झालेल्या क्रूर हत्येने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

प्रदीप सहा महिन्यांपूर्वीच शिक्षणासाठी शहरात आला होता. त्याचे वडील शेती व्यवसाय करतात. दशमेश नगरातील खोली सोडून तो दहा दिवसांपूर्वीच उस्मानपुऱ्यातील म्हाडाच्या जुन्या अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील तीन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहण्यास आला होता. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता एक मित्र रिडिंग रूम, दोन मित्र संक्रांतीनिमित्त नातेवाईकाकडे तर एक पतंग उडवण्यासाठी गेला होता. ते सर्व रात्री ९:३० वाजता खोलीवर परतले. १०:३० वाजता जेवणाची वेळ झाल्याने प्रदीपला आवाज देत त्याच्या अंगावरील पांघरूण काढल्यावर प्रदीप मृतावस्थेत आढळला. सहायक पोलिस आयुक्त डॉ. रणजीत पाटील, निरीक्षक अतुल येरमे, सहायक निरीक्षक शिवाजी चौरे यांच्यासह जवळपास ४ पथके घटनेचा तपास करत आहेत.

तब्बल १७ वारडॉक्टरांच्या माहितीनुसार, त्याच्या गळा, छाती, मान व डोक्यात एकूण १७ वार आहेत. सर्वाधिक खोल वार डोक्यात तर एक पाठीत आहे. हे सर्व वार एकाच शस्त्राने झाल्याचा अंदाजही डॉक्टरांनी व्यक्त केला.

कराटेत ब्लॅक बेल्ट- अंगकाठीने बारीक मध्यम बांध्याचा, शांत स्वभावाच्या प्रदीपला कराटे, ज्युडोची आवड होती. त्याने त्यात सर्वोच्च स्तर समजल्या जाणाऱ्या ब्लॅक बेल्टपर्यंत मजल मारली होती.- त्यामुळे त्याच्यावर सहजासहजी वार करणे अशक्य होते. प्रदीप बेडरूममध्ये झोपलेला असावा. घराचा दरवाजा उघडाच असल्याने मारेकऱ्याने प्रवेश करून त्याच अवस्थेत गळ्यावर वार केल्याचा पोलिसांना संशय आहे.

पोलिसांच्या संशयाचे हे आहेत मुद्दे- प्रदीपचे अन्य चार रूम पार्टनरसह जवळपास २० मित्रांची पोलिसांकडून चौकशी सुरू होती. यात प्रामुख्याने शनिवारचा महाविद्यालयातला वाद, अन्य मित्र, मैत्रिणींसोबतच्या वैयक्तिक वादाच्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.- मारेकऱ्याने प्रदीपचा मोबाईल सोबत नेला. ६:५५ वाजता तो बंद झाला आहे. मारेकऱ्याने मोबाईल का नेला, हे अद्यापही अनुत्तरीत आहे. त्यामुळे एखाद्या नशेखोर, लुटमारीच्या अनुषंगानेही तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर