कर्जमंजुरी नसलेल्यांना पीक विमा काढावा लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:00 IST2017-07-28T00:00:49+5:302017-07-28T00:00:49+5:30
हिंगोली : एकीकडे बिगर कर्जदार शेतकरी पीक विमा काढत असतानाच दुसरीकडे कर्जमाफीमुळे अनेकांनी यंदा कर्जच घेतले नाही. तर काहींच्या कर्जाचीच प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे अशांनाही ३१ जुलैपूर्वी कर्ज न मंजूर झाले तर बिगर कर्जदारांप्रमाणेच महा-ई-सेवा केंद्रावर जावून पीक विमा काढावा लागणार आहे.

कर्जमंजुरी नसलेल्यांना पीक विमा काढावा लागणार
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : एकीकडे बिगर कर्जदार शेतकरी पीक विमा काढत असतानाच दुसरीकडे कर्जमाफीमुळे अनेकांनी यंदा कर्जच घेतले नाही. तर काहींच्या कर्जाचीच प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे अशांनाही ३१ जुलैपूर्वी कर्ज न मंजूर झाले तर बिगर कर्जदारांप्रमाणेच महा-ई-सेवा केंद्रावर जावून पीक विमा काढावा लागणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात केवळ २८ हजार शेतकºयांनाच बँकांकडून कर्ज मिळाले आहे. ९९ कोटींचेच कर्ज वाटप झाले आहे. मात्र कोणी कर्जमाफीनंतर कर्ज मिळेल म्हणून तर कोणाचे कर्जच मंजूर झाले नाही म्हणून त्यांचा पीक विमा काढणे बाकी आहे. ज्या २८ हजार शेतकºयांनी कर्ज काढले. त्यांचा बँकांनी विमा काढला. तर कर्जवितरणासोबतच काही सहकारी बँका विमा काढत नव्हत्या. अशा बँकांनी विमा काढण्याचा आदेश सहकार आयुक्तांनी दिला आहे.
मराठवाड्यातील बिगर कर्जदार शेतकरी मोठ्या संख्येने पीकविमा भरत आहेत. नांदेड यात राज्यात अव्वल आहे.८८ हजार ९७३ शेतकºयांनी पीकविमा भरला. बीड-४६७0७, हिंगोली-१६१४३ ही, परभणी-१५८९६, जालना-१११00, उस्मानाबाद-५३0९, लातूर-३६६१ अशी दोन दिवसांपूर्वीची आकडेवारी होती. तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील अनेक जिल्हे तीन अंकी आकडेही गाठू न शकल्याचे या अहवालात दिसून येत होते.