नांदेडचे दोन स्वतंत्र तालुके करा-पाटील

By Admin | Updated: November 24, 2014 12:40 IST2014-11-24T12:07:12+5:302014-11-24T12:40:02+5:30

तालुक्यातील प्रशासकीय कार्यालयांचे नांदेड दक्षिण आणि उत्तर असे विभाजन करून दोन स्वतंत्र तालुके निर्माण करावेत, अशी मागणी आ. हेमंत पाटील यांनी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे केली.

Kar-Patil two separate Talukas of Nanded | नांदेडचे दोन स्वतंत्र तालुके करा-पाटील

नांदेडचे दोन स्वतंत्र तालुके करा-पाटील

नांदेड: तालुक्यातील प्रशासकीय कार्यालयांचे नांदेड दक्षिण आणि उत्तर असे विभाजन करून दोन स्वतंत्र तालुके निर्माण करावेत, अशी मागणी आ. हेमंत पाटील यांनी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे केली. 
नांदेड तालुक्याची लोकसंख्या आणि विस्तीर्ण क्षेत्रफळ लक्षात घेवून येथील प्रशासकीय कार्यालयांचे विभाजन आवश्यक आहे. प्रशासकीय कर्मचारी व अधिकार्‍यांवर कामाचा ताण वाढत असून प्रशासकीय कामकाजावर अनेक र्मयादा येत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. कामे खोळंबली असून सर्व प्रशासकीय कार्यालयांचे नांदेड दक्षिण व नांदेड उत्तर असे दोन स्वतंत्र कार्यालय निर्माण करावे. /(प्रतिनिधी)

Web Title: Kar-Patil two separate Talukas of Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.