किनवट पालिकेला कुलूप

By Admin | Updated: May 23, 2014 01:10 IST2014-05-23T00:26:33+5:302014-05-23T01:10:49+5:30

किनवट : येथील पालिकेला कायमस्वरुपी मुख्याधिकारी नसल्याने कर्मचार्‍यांवर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही.

Kanvit Palikela Lock | किनवट पालिकेला कुलूप

किनवट पालिकेला कुलूप

 किनवट : येथील पालिकेला कायमस्वरुपी मुख्याधिकारी नसल्याने कर्मचार्‍यांवर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. कार्यालयीन वेळेत कर्मचारी अनुपस्थित राहत असल्याचा प्रकार लक्षात येताच शिवसेनेचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती सुरज सातुरवार यांनी २२ मे रोजी दुपारी ३़१५ वाजता नगर पालिकेलाच कुलूप ठाकेले़ ३़४५ वाजता प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार शिवाजी राठोड यांनी मस्टरवर अनुपस्थित कर्मचार्‍यांची गैरहजेरी मारली़ कर्मचारी गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढल्याने कामे करून घेणे कठीण बनले असा ठपका ठेवत संतप्त नगरसेवक तथा बांधकाम सभापती यांनी नगर परिषदेच्या कार्यालयाला कुलूप ठोकून रोष व्यक्त केला़ अल्ताफ अग़फूर, अफजल खान, चंद्रकांत दुधारे व एऩएम़ गालेवार हे चार कर्मचारी गैरहजर होते. केवळ गैरहजेरी मारून चालणार नाही, कठोर कार्यवाही करा, अशी मागणी सातूरवार यांनी केली़ तेव्हा काँग्रेस नगरसेवक तथा गटनेते व्यंकटराव नेम्मानीवार यांनीही शिवसेना नगरसेवक सुरज सातुरवार यांच्या सुरात सूर मिसळला़ रितसर परवानगी न घेता गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांकडून खुलासा घेवूनच कार्यवाही करणार असे प्रभारी मुख्याधिकारी राठोड म्हणाले़ शहरात होणारे विकास कामांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोपही सातूरवार यांनी केला़ नगर परिषदेचे भूखंड अनेकांच्या ताब्यात आहेत़ हे भूखंड हडपू पाहणार्‍यांच्या ताब्यातून ते मोकळे करावे व ते भूखंड ऩप़ने ताब्यात घ्यावे तसेच शहरात होणार्‍या अनधिकृत बांधकाम धारकांवर कार्यवाही करण्याची मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सभापती अभय महाजन यांनी केली़ मनुष्यबळ कमी असल्याने बदली झालेल्या कर्मचार्‍यांना सोडले नाही, असे उपनगराध्यक्ष साजीदखान यांनी सांगितले़(वार्ताहर)

Web Title: Kanvit Palikela Lock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.