कन्नड -पिशोर रस्त्याचे काम रखडले!
By | Updated: November 28, 2020 04:08 IST2020-11-28T04:08:24+5:302020-11-28T04:08:24+5:30
शहरातून जाणारा हा रस्ता ठेकेदाराने पाच महिन्यांपूर्वी खोदून ठेवला आहे. शहरातून सुमारे पाचशे मीटर रस्ता सिमेंटचा तयार करताना रस्त्याच्या ...

कन्नड -पिशोर रस्त्याचे काम रखडले!
शहरातून जाणारा हा रस्ता ठेकेदाराने पाच महिन्यांपूर्वी खोदून ठेवला आहे. शहरातून सुमारे पाचशे मीटर रस्ता सिमेंटचा तयार करताना रस्त्याच्या एका बाजूचे काम झाले असून दुसऱ्या बाजूचे काम अर्धवट अवस्थेत आहे. परिणामी जाणारी आणि येणारी वाहने पूर्ण झालेल्या रस्त्यावरूनच धावत आहेत. तशात बऱ्याचदा या रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहतात. रस्त्यावर रहदारी जास्त असल्याने अपघात होऊ लागले आहेत. ठेकेदाराने शहरातील काम जलदगतीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.