शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कन्नड- चाळीसगाव औट्रम घाटातील दस्तूर वळणावर बस रस्त्याखाली उतरली, २० प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 18:36 IST

कन्नड- चाळीसगाव घाट संपताच शेवटच्या वळणार चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले

- प्रवीण जंजाळ कन्नड: मध्यप्रदेश परिवहन विभागाची एक बस सेंधवाकडे जात असताना आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान कन्नड- चाळीसगाव औट्रम घाटातील दस्तुरी फाट्याजवळ वळण घेत असताना रस्त्याखाली उतरली. यात कसलीही जीवितहानी झाली नसून बसमधील २० प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. यातील दोन प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर धुळे येथे उपचार सुरू आहेत.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, मध्यप्रदेश परिवहन विभागाची एक बस आज सकाळी छत्रपती संभाजीनगरहून सेंधवा येथे निघाली होती.  सकाळी अकरा वाजता कन्नड- चाळीसगाव औट्रम घाटातील दस्तुरी फाट्याजवळ वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याखाली उतरली. यात बसमधील २० प्रवासी जखमी झाले. यावेळी बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. 

दरम्यान, जखमींना उपचारासाठी चाळीसगाव येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. यातील दोन प्रवाश्यांची तब्येत गंभीर असून त्यांना अधिक उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आल्याची माहिती ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. मंदार करबळेकर यांनी दिली आहे. राजंणगाव प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. अर्पिता पाटील , सहाय्यक अधिकारी कैलास राठोड, आरोग्य सेवक नितीन तिरमली, अश्विनी बनसोडे आणि संभाजी यांनी जखमींना  तात्काळ वैद्यकीय मदत केली. तसेच माहिती मिळताच चाळीसगाव वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी पोहचून मदत कार्य केले. 

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद