कन्नड येथील व्यवसायिकाची बॅग पळविली
By | Updated: December 5, 2020 04:07 IST2020-12-05T04:07:05+5:302020-12-05T04:07:05+5:30
जैन मेडिकलचे मालक ईश्वर प्रकाश क्षीरसागर (रा.चिकलठाण) हे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन कन्नडला येत येत होते. कुंजखेडा ...

कन्नड येथील व्यवसायिकाची बॅग पळविली
जैन मेडिकलचे मालक ईश्वर प्रकाश क्षीरसागर (रा.चिकलठाण) हे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन कन्नडला येत येत होते. कुंजखेडा ते कन्नड रस्त्यावर भाट्या मारोतीजवळ लघुशंकेसाठी ते थांबले असता, तीन अज्ञात इसमांनी त्यांची बॅग पळवून नेली. या बॅगेत क्षीरसागर यांचे रोख १८ हजार रुपये, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक, बँक चेक बुक, एटीएम कार्ड व अजून इतर कागदपत्रे होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना. किरण गंडे करीत आहेत.