...म्हणून शिक्षण व्यवस्थेवर हल्ले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:43 IST2017-08-06T23:43:15+5:302017-08-06T23:43:15+5:30

सामान्यांनी शिकूच नये, अशी व्यवस्था केली जात आहे. या विरोधात देशाला लढावे लागेल असे प्रतिपादन विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने केले.

Kanhaiya Kumar criticises BJP govt. | ...म्हणून शिक्षण व्यवस्थेवर हल्ले !

...म्हणून शिक्षण व्यवस्थेवर हल्ले !

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला शिकण्याचा सल्ला दिला होता. कारण शिक्षण घेतले तर आम्ही प्रश्न विचारायला शिकू. आमचे शोषण होत आहे. हे आम्हाला कळेल; मात्र या सरकारला हेच नको आहे. शोषित वर्ग शिकला तर तो प्रश्न विचारेल. म्हणून शिक्षण व्यवस्थेवरच हल्ले केले जात आहेत. सामान्यांनी शिकूच नये, अशी व्यवस्था केली जात आहे. या विरोधात देशाला लढावे लागेल असे प्रतिपादन विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने केले.
कन्हैया कुमारच्या बीड दौºयात ‘कॉफी विथ कन्हैया’ या कार्यक्रमात त्याने उपस्थितांशी मुक्त संवाद साधला. प्रा.डॉ. हेमराज वुईके यांनी प्रकट मुलाखत घेतली. यात कन्हैया कुमारने अनेक विषयांवरील आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
महाराष्ट्राला क्रांतीचा इतिहास आहे. आणि आझादीचा नारा हा काही आपण पहिल्यांदा दिला नाही. आज वर्णवाद, भांडवलशाही, सरंजामशाही यांच्या विरोधात आम्ही आझादी मागत आहोत. मोदी जसे या देशाचे नागरिक आहेत, तसाच मीही या देशाचा नागरिक आहे. प्रत्येक माणूस या देशावर प्रेम करतो, तितकेच प्रेम मी देखील करतो. एका गरीब कुटुंबातून आलेला मी विद्यार्थी आहे. मात्र या देशात गरीब असणे हाच गुन्हा आहे. तुम्ही गरीब असाल तर तुम्हाला चोर, बेईमान, दंगाई, देशद्रोही काहीही ठरवता येते. गरीब असून तुम्ही शिकता हा तर फार मोठा गुन्हा आहे. कारण तुम्ही शिकून प्रश्न विचारता आणि सत्तेला प्रश्न नको आहेत. जर नरेंद्र मोदी पस्तीसाव्या वर्षी एम.ए. करू शकतात. तर तिसाव्या वर्षी मी पीएचडी केली तर माझ्यावर प्रश्न का उपस्थित होतात? आम्ही शिकलो तर यांची गुलामी कोणी करणार नाही. त्यामुळे त्यांनी सामान्यांचे शिक्षण बंद केले आहे. मोदींच्या विदेश दौºयावर जेवढा पैसा खर्च होतो. त्याच्या निम्यामध्ये विद्यापीठातील फेलोशिप सुरू होऊ शकते. मात्र सरकारला हे करायचे नाही. विचार करणारे लोक सरकारला नको असून विद्यापीठामधून केवळ मशिन तयार व्हाव्यात, अशी या सरकारची धारणा आहे. आणि हेच बदलण्यासाठी विद्यार्थी चळवळी महत्त्वाच्या आहेत, असे कन्हैया कुमार म्हणाला.

Web Title: Kanhaiya Kumar criticises BJP govt.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.