कानडी तलावाचे कामही लालफितीत
By Admin | Updated: April 13, 2016 00:53 IST2016-04-13T00:45:07+5:302016-04-13T00:53:57+5:30
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्याय म्हणून कानडी लघुसिंचन तलावाची चाचपणी सुरू होती. जमीन संपादन करुन कामाला सुरुवातही केली

कानडी तलावाचे कामही लालफितीत
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्याय म्हणून कानडी लघुसिंचन तलावाची चाचपणी सुरू होती. जमीन संपादन करुन कामाला सुरुवातही केली, मात्र मावेजापोटी कमी मोबदला मिळाल्याने शेतकऱ्यांनी काम बंद पाडले ते आणखी सुरुच झालेले नाही.
पंधरा वर्षांपासून येथील पाण्याचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. मांजरा धरणातून पाणी उपलब्ध झाले नाही तर पर्याय म्हणून कानडी बदन बृहत लघुसिंचन तलावाची निर्मिती होणार होती. ३.२५१ दलघमी क्षमतेच्या या तलावाच्या कामाला २००७ मध्ये मंजुरी देखील मिळाली होती. जानेवारी २०१० मध्ये कामाच्या उद्घाटनाचा नारळ फुटला परंतु त्यानंतर हे काम पूर्णत्वास गेले नाही. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या तलावासाठी संपादित केल्या होत्या त्या शेतकऱ्यांनी योग्य मोबदला न मिळाल्याचा आरोप करीत ते काम बंद पडले. तेंव्हापासून आजपर्यंत हे काम बंदच आहे. तलावाचे काम आजही लालफितीत अडकलेले आहे.
विकतच्या पाण्यावर मदार
अंबाजोगाई शहरात सध्या पाण्याचा धंदा जोमात सुरु आहे. अनेक व्यावसायिक, कुटुंबांनी विकतच्या पाण्याचा ‘रतीब’ लावला आहे. काहीजणांनी महिन्याकाठी पाण्यासाठी वेगळी तरतूद करण्याची सवय लावली आहे. दरम्यान, जून महिन्यात वेळेवर पाऊस झाला तर ठीक अन्यथा अंबाजोगाईकरांना इतर पर्याय शोधाशोध करणे अपरिहार्य ठरणार आहे.