कंधारात लाचप्रकरणी शिपायास अटक
By Admin | Updated: January 6, 2015 13:05 IST2015-01-06T13:02:32+5:302015-01-06T13:05:38+5:30
कंधार येथील दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयातील शिपायास ३00 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले.

कंधारात लाचप्रकरणी शिपायास अटक
नांदेड : कंधार येथील दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयातील शिपायास ३00 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले.
खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदी खताच्या नक्कला देण्यासाठी शिपाई हरिकृष्ण गोविंदराव पांचाळ यांनी ३00 रुपयांच्या लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने यासंबधी अँन्टी करप्शन ब्युरो नांदेड कार्यालयात तक्रार दिली. तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळा कार्यवाहित कंधार दुय्यम निबंधक कार्यालयातील शिपाई हरिकृष्ण गोविंदराव पांचाळ वय ३३ यास ५ जानेवारी रोजी कंधार येथे ३00 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
यात अप्पर पोलिस अधीक्षक एन. व्ही. देशमुख, पोलिस निरीक्षक एस. जे. माने, अशोक गिते, पोहेकॉ अर्जुनसिंग ठाकूर, पो. ना.बाबु गाजुलवार, मारोती केसगीरे, शेख अनवर यांनी सापळा कार्यवाहीत सहभाग नोंदविला. तपास पो. नि. माने करीत आहेत./(प्रतिनिधी)