कामानिमित्त तहसील कार्यालय पुन्हा बहरले

By Admin | Updated: July 30, 2015 00:19 IST2015-07-30T00:19:30+5:302015-07-30T00:19:30+5:30

जाफराबाद : नागरिकांचे कामे न करता विना परवानगी गैरहजर राहणाऱ्या तहसील कार्यालयाच्या कारभाराविषयी लोकमतने केलेल्या स्टिंग आपरेशनचा परिणाम

The kamnitit tehsil office was rejuvenated | कामानिमित्त तहसील कार्यालय पुन्हा बहरले

कामानिमित्त तहसील कार्यालय पुन्हा बहरले


जाफराबाद : नागरिकांचे कामे न करता विना परवानगी गैरहजर राहणाऱ्या तहसील कार्यालयाच्या कारभाराविषयी लोकमतने केलेल्या स्टिंग आपरेशनचा परिणाम दुसऱ्या दिवशी दिसून आला. दुसऱ्या दिवशी सकाळीच तहसीलदार भाऊसाहेब थोरात प्रशिक्षणार्थी तहसीलदार यांनी कार्यालयीन कामकाज सुरू केले. दरम्यान महसूल विभागाच्या कर्मचारी यांना बोलावून नियमीत हजर राहणाऱ्या व काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच कानउघडणी केली. वास्तविक पाहता अधिकारीच हजर नाही तर कामकाज कसे चालणार याची कल्पनाही नसावी म्हणूनच साहेब बोलतात अशी चर्चा तहसिल वर्तुळात ऐकावयास मिळाली.
तहसिल कार्यालय प्रमुख नियमित येऊन सुध्दा बदल्यात कर्मचाऱ्यांना एकेरी भाषेत बोलून अवमान करीत असल्याचे कर्मचाऱ्यांत दिसून आले. त्यांच्या या कारभाराविषयी तलाठी संघटना व महसूल संघटना यांनी आक्षेप घेऊन उपविभागीय अधिकारी यांच्यापर्यंत तक्रार गेली आहे. तरी सुध्दा घरचे भांडण घरातच राहावे म्हणून असे अनेक प्रकरणे जागेवरच थांबविली आहे. प्रशिक्षणार्थी, नायब तहसिलदार यांची सुध्दा कामे न करता इतर विषयात अडचण निर्माण करणचे काम करतात. अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. एकंदरीत अधिकारी यांच्या या अनागोंदी कारभारामुळे याचा त्रास कर्मचारी व नागरिकांना सहन करावा लागत आहे.
लोकमतने केलेल्या स्टिंग आपरेशनच्या दुसऱ्या दिवशी परत तहसिलदार काही कामानिमित्त सकाळी ११ वाजेच्या दरम्यान निघून गेले तर नायब तहसिलदार शाम वाडकर हे ग्राम पंचायत निवडणूक कामात परत कार्यालयाचे दार बंद करून जाऊन बसले. वास्तविक पाहता सर्वसामान्य जनतेच्या सेवे करीता कार्यालये आहेत.
परंतु, कार्यालयात कोणीच येऊ नये अशी भूमिका या अधिकाऱ्यांची आहे. तहसिल कार्यालयात येणारा प्रत्येक नागरिक हा कामानिमित्त, मग याचा त्रास अधिकाऱ्यांना का असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय वरिष्ठ अधिकारी आपल्या सोयीनुसार सुट्टी घेऊन विश्रांती घेतात व इतर कर्मचारी यांची बैैठक मात्र सुट्टीच्या दिवशी मुद्दामहून घेतात. आणि इतर कामासाठी तलाठी, मंडळ अधिकारी, कार्यालय कर्मचारी यांची ड्युटी लावण्यात येत असल्याचा प्रकार सुध्या नियमित घडत असल्याचे एका कर्मचाऱ्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर पत्रकार कार्यालयात आलाच कसा, इथपर्यंत ह्या अधिकारी विनाकारण कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याचे एकंदरीत चित्र या कार्यालयात दिसून येते. (वार्ताहर)

Web Title: The kamnitit tehsil office was rejuvenated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.