कंधार नगराध्यक्षपदी केंद्रे, उपनगराध्यक्षपदी कांबळे
By Admin | Updated: August 17, 2014 00:53 IST2014-08-17T00:37:49+5:302014-08-17T00:53:36+5:30
कंधार : कंधार पालिकेच्या नगराध्यक्षपदी अनुसया केंद्रे तर उपनगराध्यक्षपदी सुधाकर कांबळे यांची निवड १६ आॅगस्ट रोजी विशेष सभेत झाली.

कंधार नगराध्यक्षपदी केंद्रे, उपनगराध्यक्षपदी कांबळे
कंधार : कंधार पालिकेच्या नगराध्यक्षपदी अनुसया केंद्रे तर उपनगराध्यक्षपदी सुधाकर कांबळे यांची निवड १६ आॅगस्ट रोजी विशेष सभेत झाली. दोन्ही पदाच्या निवडीत माजी आ. प्रताप पाटील चिखलीकर यांची सरशी झाली. नाट्यमयरित्या नळगे-चिखलीकर गटाचे नगरसेवक व भाजपाच्या नगरसेवकाची साथ निवडीत दिसून आली.
न.प.निवडणुकीत चिखलीकर-नळगे यांना १७ पैकी १३ जागी विजयी मिळाला. नगराध्यक्ष- उपनगराध्यक्ष निवडी सहज पार पडल्या. परंतु चिखलीकर-नळगे यांच्यात राजकीय विसंवाद आला. त्यामुळे न.प. सभागृहात याची प्रचिती अनेकदा आली. नगराध्यक्षा शोभाताई नळगे व उपनगराध्यक्ष जफरोद्दीन बाहोद्दीन यांचा कार्यकाल संपत आल्याने नवीन कार्यक्रम जाहीर झाला आणि राजकारण पुन्हा तापले. नळगे गटाकडून डॉ. बडवणे, चिखलीकर गटाकडून अनुसया केंद्रे व काँग्रेसकडून मंगनाळे यांचे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
अनुसया केंद्रे यांना चिखलीकर- नळगे गटाचे १३ व भाजपाचे १ अशी १४ मते मिळाली. काँग्रेस उमेदवारास २ मते मिळाली. उपनगराध्यक्षपदासाठी चिखलीकर गटाचे सुधाकर कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे बिनविरोध निवड झाली. पिठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, सईदखाँ आदींची यावेळी उपस्थिती होती. (वार्ताहर)