काल्डा कॉर्नरला तीन लाख रुपयांची लूट

By Admin | Updated: July 14, 2016 01:35 IST2016-07-14T01:30:24+5:302016-07-14T01:35:48+5:30

औरंगाबाद : वर्दळीच्या काल्डा कॉर्नर परिसरात बुधवारी रात्री पल्सरस्वार तीन अज्ञात लुटारूंनी एका व्यापाऱ्याला अडवून मारहाण करून त्याचे तीन लाख रुपये लुटले.

Kalda Corner looted three lakh rupees | काल्डा कॉर्नरला तीन लाख रुपयांची लूट

काल्डा कॉर्नरला तीन लाख रुपयांची लूट

औरंगाबाद : वर्दळीच्या काल्डा कॉर्नर परिसरात बुधवारी रात्री पल्सरस्वार तीन अज्ञात लुटारूंनी एका व्यापाऱ्याला अडवून मारहाण करून त्याचे तीन लाख रुपये लुटले. या झटापटीत एक लाख रुपये खाली पडले. उरलेले दोन लाख रुपये घेऊन पळून जाण्यात लुटारू यशस्वी झाले. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर सर्वत्र नाकेबंदी करून पोलिसांनी लुटारूंचा शोध सुरू केला.
घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, निमेश पटेल (३२, रा. राठी कॉम्प्लेक्स, काल्डा कॉर्नर) हे फायनान्सचा व्यवसाय करतात. गुलमंडीत त्यांचे कार्यालय आहे. नियमित पैशांची ने- आण ते करीत असतात. नित्याप्रमाणे बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ते मित्रासोबत स्कूटीवर घरी येत होते. मित्र स्कूटी चालवीत होता. पटेल यांच्याजवळ एका बॅगमध्ये तीन लाख रुपये रोख रक्कम होती.
घराजवळच दबा धरून बसले लुटारू
आठ वाजून दहा मिनिटांनी घराजवळच येताच एका पल्सरवर आलेल्या तिघांनी पटेल यांची दुचाकी अडविली आणि ‘चल पैसे निकाल’ असे म्हणत त्यांच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. पटेल यांनी विरोध करताच तिन्ही आरोपींनी त्यांना मारहाण सुरू केली. मारहाण करीत आरोपींनी (पान ५ वर)
असाही प्रामाणिकपणा
लुटारूंसोबत झालेल्या झटापटीत पटेल यांच्या बॅगमधील एक लाखांनी भरलेली कॅरिबॅग खाली पडली होती. त्यावेळी तेथे जवळच राहणारे स्वप्नील साबळे या तरुणाला ही कॅरिबॅग नजरेस पडली. त्याने ती उचलली. त्यात एक लाख रुपये रोख होते. स्वप्नीलने प्रामाणिकपणा दाखवून हे एक लाख रुपये पटेल यांना परत दिले.

Web Title: Kalda Corner looted three lakh rupees