पीडितांना न्यायासाठी कहार समाजाचा मोर्चा
By Admin | Updated: August 15, 2014 01:35 IST2014-08-15T01:18:25+5:302014-08-15T01:35:39+5:30
गेवराई : माजलगाव येथे कहार, भोई समाजातील लोकांवर मासेमारीच्या ठेकेदारीतून काही दिवसांपूर्वीच हल्ला झाला होता. या हल्ल्यातील पीडितांना न्याय द्यावा यासाठी

पीडितांना न्यायासाठी कहार समाजाचा मोर्चा
गेवराई : माजलगाव येथे कहार, भोई समाजातील लोकांवर मासेमारीच्या ठेकेदारीतून काही दिवसांपूर्वीच हल्ला झाला होता. या हल्ल्यातील पीडितांना न्याय द्यावा यासाठी गेवराई तहसीलवर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी घोषणा दिल्याने शहर दणाणले होते.
माजलगाव येथील धरणातील मासेमारीवरून ठेकेदार व तेथील कहार, भोई समाजातील बांधव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करून भोई, कहार समाजाला मासेमारी करण्यास परवानगी द्यावी यासाठी मोर्चे, आंदोलन, उपोषण आदी केले होते. काही दिवसांपूर्वीच येथे भोई, कहार समाजातील बांधवांवर हल्लाही झाला होता. यावेळी काही महिला, पुरूष गंभीर जखमी झाले होते. या जखमींना न्याय देण्यासाठी व हल्लेखोरांवर कठोर कारवाईसाठी गेवराई शहरात मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदनही दिले. यावेळी अॅड. लक्ष्मण पवार, अजय दाभाडे, बाळासाहेब गायकवाड, समाधान मस्के, अरूण लिंबोरे, दत्ता जाधव, राम लिंबोरे आदी उपस्थित होते.(वार्ताहर)