कडबा मार्केटची जागा पणन मंडळाच्या ताब्यात

By Admin | Updated: November 27, 2014 01:09 IST2014-11-27T00:50:35+5:302014-11-27T01:09:35+5:30

औरंगाबाद : जुना मोंढा, जाफरगेट परिसरातील कडबा मार्केटचे स्थलांतर जाधववाडीत करण्यात येणार होते. यासाठी कडबा विक्रेत्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पैसेही भरले होते;

Kadaba Market Place | कडबा मार्केटची जागा पणन मंडळाच्या ताब्यात

कडबा मार्केटची जागा पणन मंडळाच्या ताब्यात


औरंगाबाद : जुना मोंढा, जाफरगेट परिसरातील कडबा मार्केटचे स्थलांतर जाधववाडीत करण्यात येणार होते. यासाठी कडबा विक्रेत्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पैसेही भरले होते; पण नंतर पाठपुरावा न केल्याने कडबा मार्केटची जागा पणन मंडळाने ताब्यात घेतली. परिणामी, आजघडीला जाधववाडीत जागा नसल्याने बाजार समितीने विक्रेत्यांचे पैसे परत करणे सुरू केले आहे.
जाफरगेट परिसरात जेथे दर रविवारी आठवडी बाजार भरतो, त्या ठिकाणी महानगरपालिकेने भाजी विक्रेत्यांसाठी ओटे व शेड बांधून दिले आहेत. त्या जागेवर अनेक वर्षांपासून कडबा विक्री होत आहे. परिणामी, ओटे असूनही भाजी विक्रेत्यांना मातीतच बसावे लागत आहे. या परिसरातून कडबा मार्केट हलविण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील रहिवासी मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत. येथील कडबा मार्केटचे जाधववाडीतील तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर स्थलांतर करण्यासाठी २००७ मध्ये बाजार समितीने पुढाकार घेतला होता. यास येथील ३८ कडबा विक्रेत्यांनी प्रतिसाद देत प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे १ लाख ९० हजार रुपये बाजार समितीकडे भरले होते. मात्र, नंतर विक्रेत्यांनीही जागेसंदर्भात पुढील रक्कम भरली नाही. दुसरीकडे बँकेचे कर्ज फेडण्यासाठी पणन मंडळाने बाजार समितीला १४.५० कोटींची रक्कम दिली. बँकेच्या कर्जफेडीच्या मोबदल्यात बाजार समितीने पणन मंडळाला येथील १९ एकर जागा दिली. त्यानंतर येथील ५० एकरपर्यंत जागा पणन मंडळाने घेतली. यात कडबा मार्केटसाठीची जागाही पणन मंडळाच्या ताब्यात गेली. यासंदर्भात बाजार समितीचे सचिव एन.ए. अधाने यांनी सांगितले की, आजघडीला बाजार समितीतील शिल्लक रिकाम्या जागा विविध व्यवसायांसाठी राखीव आहेत. यामुळे सध्या कडबा मार्केटसाठी आमच्याकडे जागा शिल्लक नाही; पण भविष्यात अन्य विवादित जागेचा निकाल बाजार समितीच्या बाजूने लागला, तर आम्ही कडबा मार्केट, गुरांच्या बाजारासाठी जागा उपलब्ध करून देऊ. ज्या कडबा विक्रेत्यांनी बाजार समितीकडे पैसे भरले आहेत, त्यांना पैसे वापस केले जात आहेत.1
अडत व्यापारी हरीश पवार यांनी सांगितले की, कडबा मार्केटच्या जागेसाठी बाजार समितीने विक्रेत्यांकडून रक्कम घेतली होती. त्यापूर्र्वी किराणा व्यापारी, रॉकेल विक्रेत्यांकडूनही अशीच रक्कम घेतली.
2 कडबा मार्केटसाठी ४ एकर जागेचा प्रस्ताव होता. २००७ पासून बाजार समितीने कडबा विक्रेत्यांचे पैसे घेऊन ठेवले व आता जागा शिल्लक नसल्याचे कारण सांगून व्यापाऱ्यांना पैसे परत केले जात आहेत.
3 पणन मंडळाने ५० एकर जागा घेऊन तिचा विकास केला नाही. यामुळे मंडळाकडील जागा परत घेऊन कडबा विक्रेते, किराणा व्यापारी व रॉकेल विक्रेत्यांना द्यावी नसता व्याजासह रक्कम व्यापाऱ्यांना परत करावी.

Web Title: Kadaba Market Place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.