कचनेर यात्रेस ध्वजारोहणाने सुरुवात
By Admin | Updated: November 6, 2014 01:37 IST2014-11-06T01:11:26+5:302014-11-06T01:37:41+5:30
महावीर पांडे , कचनेर श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर यात्रा महोत्सवास बुधवारी मुख्य ध्वजारोहण करून मोठ्या भक्तिभावाने सुरुवात झाली.

कचनेर यात्रेस ध्वजारोहणाने सुरुवात
महावीर पांडे , कचनेर
श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर यात्रा महोत्सवास बुधवारी मुख्य ध्वजारोहण करून मोठ्या भक्तिभावाने सुरुवात झाली. ध्वजारोहण औरंगाबाद निवासी फुलचंद मनोजकुमार दगडा परिवारातर्फे करण्यात आले. या मंगलमयी प्रसंगी प. पूज्य उपाध्याय मनमितसागरजी महाराज, प. पूज्य मुनिश्री संयमसागरजी महाराज, मुनिश्री प्रसन्न चंद्रमुनी महाराज, प. पूज्य आर्यिका आगमती माताजी यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष माणिकचंदजी गंगवाल, विश्वस्त सुरेशकुमार कासलीवाल, क्षेत्राचे सहसचिव मनोज साहुजी, नितीन गंगवाल, अशोक अजमेरा, किरण मास्ट, नरेंद्र अजमेरा, विश्वस्त केशरीलाल जैन, नीलेश काला, विनोद पाटणी, नीलेश काला, मुख्य पूजारी जैन मंदिर रामदास जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. १० वाजता भगवंतांच्या अभिषेकाची बोली होऊन मूलनायक श्री चिंतामणी पार्श्वनाथ भगवंतांचा पंचामृत महामस्तकाभिषेक करण्यात आला. इंद्र-इंद्रायणीची बोली नाभिराज परसोबा मास्ट, जलाभिषेकची बोली पवनकुमार नाना लालजी गांधी (इंदोर), तीर्थरक्षक बोली/ संतोष श्रीपाल पुरणजळकर (हिंगोली), शांतीधाराची बोली सूरजमलजी राजेंद्रकुमार गंगवाल (शिर्डी) यांनी घेतली. तीन दिवशीय यात्रा महोत्सवासाठी देशभरातून व राज्यभरातून हजारो भाविक उपस्थित झाले आहेत.
परभणी, जिंतूर, औरंगाबाद, नाशिक, कोपरगाव, श्रीरामपूर, जळगाव, अमळनेर, भुसावळ, श्रीरामपूरसह राज्याच्या काना-कोपऱ्यातून पायी यात्रेकरूंच्या दिंड्या दाखल झाल्या आहेत. पायी यात्रेकरूंसाठी ठिकठिकाणी नाश्ता, चहाची व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे शासकीय स्तरावर पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, विद्युत मंडळ, एस.टी. महामंडळ, अग्निशामक दल, बांधकाम विभाग यांनी यात्रेच्या काळात चोख व्यवस्था ठेवली. पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांच्या नेतृत्वाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रिया थोरात यांच्यासह नऊ पोलीस अधिकारी, ९० पुरुष पोलीस कर्मचारी, १८ महिला पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त येथे आहे. भक्तिमय व संगीतमय वातावरणात अभिषेक करण्यात आला. हिंगोली ते कचनेर पदयात्रेकरूंचा यावेळी संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला. २४० कि़मी. अंतर या यात्रेकरूंनी ७ दिवसांत पूर्ण केले. संघप्रमुख उदय सोवितकर हे आहेत.
अभिषेक सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजचे वैशिष्ट्य म्हणजे महाप्रसादाच्या वेळेस अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून औरंगाबाद येथील अरुणा ठोळे, मंजू पाटणी, नीलिमा ठोळे, कविता अजमेरा, पुष्पा ठोळे, लताबाई गंगवाल, प्रेमा लोहाडे, किरण पांडे, शांताबाई गंगवाल व हडको येथील महिला मंडळ जातीने लक्ष ठेवून होते. यात्रा यशस्वीतेसाठी विश्वस्त मंडळ, कार्यकारिणी मंडळ, जैन मंदिराचे कर्मचारी वृंद प्रयत्नशील आहेत.
कचनेर : श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर येथे बुधवारी यात्रा महोत्सवानिमित्त राज्याचे माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचा क्षेत्राच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दर्डा यांनी यात्रा महोत्सवाबद्दल माहिती जाणून घेतली व समाधान व्यक्त केले. अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून महिला मंडळाने घेतलेल्या मेहनतीची त्यांनी प्रशंसा केली.
४राजेंद्र दर्डा यांच्यासोबत पंकज फुलपगर, जी.एम. बोथरा, आ. संजय पाटील बेळगाव (कर्नाटक) यांचाही सत्कार करण्यात आला.
४याप्रसंगी विश्वस्त माणिकचंदजी गंगवाल, सुरेश कासलीवाल, भरत ठोळे, मनोज साहुजी, किरण मास्ट, बिपीन कासलीवाल, नीलेश काला, नितीन गंगवाल, प्रमोद कासलीवाल व कचनेर क्षेत्राचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.