न्यायाधीशांनी रुजवीला स्वच्छतेचा जागर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 18:03 IST2017-08-10T18:02:23+5:302017-08-10T18:03:36+5:30

न्यायाधिश एम.एस.शेख यांनी स्वच्छतेचा ध्यास घेवून न्यायालयात व परिसरात स्वच्छता मोहिम राबवली. स्वतः न्यायाधिशांनी हातात झाडू घेवून परिसर स्वच्छ केल्याने सर्व न्यायालयीन कर्मचारी व वकीलांनीही आपला स्वंयस्पुर्तीने सफाईच्या कार्यात सहभाग घेतला. 

justice takes iniciative for cleaning the court | न्यायाधीशांनी रुजवीला स्वच्छतेचा जागर 

न्यायाधीशांनी रुजवीला स्वच्छतेचा जागर 

ऑनलाईन लोकमत 

नांदेड, दि. १० : भोकर  येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एम.एस.शेख यांनी स्वच्छतेचा ध्यास घेवून न्यायालयात व परिसरात स्वच्छता मोहिम राबवली. स्वतः न्यायाधिशांनी हातात झाडू घेवून परिसर स्वच्छ केल्याने सर्व न्यायालयीन कर्मचारी व वकीलांनीही आपला स्वंयस्पुर्तीने सफाईच्या कार्यात सहभाग घेतला. 

जिल्हा सत्र न्यायालयात गुरुवारी सकाळी ८ वाजता न्यायालयाच्या आतील भागात व परिसरात स्वच्छता करण्यात आली. स्वतः न्यायाधिशांनी हातात झाडु, फावडा घेवून स्वच्छतेला सुरवात केली. यामुळे अनेक दिवसांपासून परिसरात व आवारात  वाढलेला कचरा व  घान दुर झाला. या वेळी प्रथम न्यायदंडाधिकारी पी.जी.महाळंकर, दिवानी न्यायाधीश एस.एम.कांबळे, सह दिवानी न्यायाधीश श्रीमती बी.ए.तळेकर, जेष्ठ विधीतज्ञ अॅड. गोविंदराव लामकाणीकर,  सरकारी वकील एस.आर.कस्तुरे, अॅड. राजुरकर, अॅड. मिलिंद देशमुख, अॅड. बी.डी.कुलकर्णी, अॅड. एस.एस.कुंटे. अॅड. कदम, अॅड. जाधव, अॅड. खाडे, अॅड. कोरेवाड, अॅड.दिपक भातलवंडे, अॅड. अल्तपाश, अॅड. संदिप कुंभेकर, न्यायालयीन कर्मचारी व नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी संभाजी वाघमारे यांच्या सह अनेकांनी सहभाग घेवून परिसर स्वच्छ केला. 

यावेळी न्या.एम.एस.शेख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून न्यायालयात व परिसरात स्वंयस्पुर्तीने स्वच्छता करण्यात येत आहे. या पुढे न्यायालय परिसरात घाण करणाऱ्यांची गय न करता रु. ५०० दंड आकारण्यात येईल. तसेच न्यायालयीन परिसर कायम स्वच्छ व सुंदर राहील याची काळजी घेतली जाईल. 

Web Title: justice takes iniciative for cleaning the court