बस उलटून एक ठार; २२ जखमी
By Admin | Updated: May 26, 2015 00:50 IST2015-05-26T00:28:42+5:302015-05-26T00:50:35+5:30
कन्नड : कन्नड आगाराची सिल्लोड-कन्नड बस सोमवारी दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास कोळसवाडी गावाच्या अलीकडे उलटल्याने एक प्रवासी महिला ठार, तर २२ जण जखमी झाले.

बस उलटून एक ठार; २२ जखमी
कन्नड : कन्नड आगाराची सिल्लोड-कन्नड बस सोमवारी दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास कोळसवाडी गावाच्या अलीकडे उलटल्याने एक प्रवासी महिला ठार, तर २२ जण जखमी झाले.
ठगनाबाई भाऊलाल भगुरे (६५), रा. नाचनवेल, ता. कन्नड ही महिला मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. कन्नड आगाराची सिल्लोड-कन्नड बस (क्र. एम एच-२०-डी-९९२४) सोमवारी दुपारी कन्नडकडे येत असताना कोळसवाडी गावाच्या अलीकडे अभयारण्यातील चिचबारीजवळ रस्त्याच्या बाजूस उलटली. त्यानंतर बसने दोन पलट्या खाल्ल्याचे प्रवाशांनी सांगितले.
बस रस्त्यापासून सुमारे ३० फूट खोलवर पलटी झाली. बस पलटी झाल्याने एकच हाहाकार उडाला. बसमधून बाहेर पडण्यासाठी सर्वच प्रवाशांनी जिवाच्या आकांताने प्रयत्न केले. त्याच रस्त्याने पाठीमागून येणाऱ्या बसमधून सर्व जखमी प्रवाशांना कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. गंभीर जखमी तुळसाबाई लोहार, कमल परदेशी, रेखा परदेशी, भास्करराव शेळके, किशोर भिसे, नारायण उपळकर, चालक इब्राहीम शहा, अस्माखान, सुलोचना चौथमल, जनार्धन मोकासे, कमलबाई रमेश परदेशी, गोविंद सरोदे यांना उपचारार्थ त्वरीत घाटी रुग्णालयात रवाना करण्यात आले.
शीतल संजय जाधव (१७), संगीता संजय जाधव (३५), सुलोचना कडूबा चौथमल (६०), नारायण उपळकर (५५), दगडचंद किसन सोनवणे (३८), सर्व रा. पिशोर, किशोर दगडू भिसे (२५), रा. बोरगाव बाजार, ता. सिल्लोड, तुळशीराम उमाजी अंभोरे (७१), रा. सिल्लोड, गोविंद सरोदे (७१), रा. देवगाववाडी, ता. सिल्लोड, अतिक खान (२५), अस्माखान (२५), वंदना मोहन शेवाळे (२६) सर्व रा. मालेगाव, योगिता शिवाजी मोतिंगे (३०) रा. बनशेंद्रा, पूजा गणपत सोनवणे (१३), खामगाव, ता. फुलंब्री, बळीराम उत्तम भोसले (३८), रा. आडगाव (पि), जनार्धन भाऊराव मोकासे (६०), रा. पिशोर, भास्कर पंडितराव शेळके (६०), रा. टाकळी, कमलबाई रमेश परदेशी (६०), रा. कुराड, ता. पाचोरा, रेखा प्रताप परदेशी (६०), रा. चाळीसगाव, कमल गोकुळ परदेशी (६०), रा. भराडी, तुळसाबाई शामलाल लोहार (४५), रा. कुराड, ता. पाचोरा, वाहक रत्नाकर विठ्ठल ताठे (५०), रा. देवपूळ, ता. कन्नड, इब्राहिमशहा मुन्सी (चालक) (४०), रा. नाचनवेल, ता. कन्नड अशी जखमींची नावे आहेत.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक ए. ए. सिद्दीकी पोलीस लवाजम्यासह होते. आगारप्रमुख एल. व्ही. लोखंडे हेही अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी, तसेच ग्रामीण रुग्णालयात जखमींची विचारपूस करीत होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवगावकर, प्रवीण पवार, विशाल बेंदरे व प्रशांत कोंडेकर यांनी जखमींवर उपचार केले.