बस खड्ड्यात गेल्याने पाटा तुटला; प्रवासी बालंबाल बचावले
By Admin | Updated: July 25, 2016 00:38 IST2016-07-25T00:26:20+5:302016-07-25T00:38:18+5:30
किनगाव : गोढाळा-माकेगाव-कारेपूर मार्गावर अहमदपूर आगाराच्या एका बसचा खड्ड्यामुळे पाटा तुटला. रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना माकेगावनजीक घडली.

बस खड्ड्यात गेल्याने पाटा तुटला; प्रवासी बालंबाल बचावले
किनगाव : गोढाळा-माकेगाव-कारेपूर मार्गावर अहमदपूर आगाराच्या एका बसचा खड्ड्यामुळे पाटा तुटला. रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना माकेगावनजीक घडली. दरम्यान, या अपघातात प्रवासी बालंबाल बचावले.
अहमदपूर आगाराची बस (क्र. एमएच २० डी ९५९८) ही अहमदपूर येथून लातूरकडे सकाळी निघाली होती. गोढाळा येथून माकेगावकडे गेली व तेथून परत येत असताना या गावानजीक खड्ड्यामुळे बसचा पाटा तुटला. चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबविली. मात्र गाडी खड्ड्यात अडकली. दरम्यान, एक-दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या बसचा पाटा अगोदरच खराब होता की, खड्ड्यामुळे पाटा तुटला, अशी चर्चा प्रवाशांतून होत होती. या मार्गावरील रस्ताही अत्यंत खराब झाला असून, रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे गोढाळा-माकेगाव रोडवरील या खड्ड्यांमुळे बसचा पाटा तुटला. काही प्रवासी जखमी झाले. दुरुस्ती करेपर्यंत प्रवाशांना थांबावे लागले.
प्रवाशांच्या या गैरसोयीला एस.टी. प्रशासन आणि बांधकाम विभाग जबाबदार असल्याचे यावेळी बसमधील प्रवासी म्हणाले.(वार्ताहर)