२१ डिसेंबर रोजी गुरू- शनी युती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:31 IST2020-12-17T04:31:01+5:302020-12-17T04:31:01+5:30

सायंकाळी ५ : ३० वाजता सूर्यास्त होणार असून पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी गुरू ग्रहाच्या वरच्या बाजूला शनी ग्रह दिसणार ...

Jupiter-Saturn alliance on December 21 | २१ डिसेंबर रोजी गुरू- शनी युती

२१ डिसेंबर रोजी गुरू- शनी युती

सायंकाळी ५ : ३० वाजता सूर्यास्त होणार असून पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी गुरू ग्रहाच्या वरच्या बाजूला शनी ग्रह दिसणार असून ही खगोलीय घटना नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. रात्री ८ वाजेपर्यंत हे दृश्य पाहायला मिळणार असून नुसत्या डोळ्यांनी पाहताना हे दाेन्ही ग्रह एकच आहेत की काय, असे वाटू शकते, असे औंधकर यांनी सांगितले.

गुरू ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी ११.८६ पृथ्वी वर्षे तर शनी ग्रहाला २९.५ पृथ्वी वर्षे लागतात. साधारण दर वीस वर्षांत ह्या दोन्ही ग्रहांची युती आकाशात पाहायला मिळते; परंतु दोन्ही मधील ०६ कोनीय मिनिटे अंतर हे ३९७ वर्षानंतर पहायला मिळेल. या आधी १६ जुलै १६२३ रोजी म्हणजे गॅलिलीओ द्वारा दुर्बिणीच्या शोधानंतर ही दुसरीच घटना असेल. गुरू-पृथ्वी अंतर ८८ कोटी ६७ लाख ४८ हजार ५४४ किमी तर शनी- पृथ्वी अंतर १६० कोटी ९३ लाख ४४००० हजार किमी असणार आहे. एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राच्या वतीने गुरू- शनीच्या या महायुतीचे निरीक्षण मोठ्या दुर्बिणीद्वारे केले जाणार आहे. दि.१७ ते २२ डिसेंबर दरम्यान सायं. ६:१५ ते ७:१५ पर्यंत नागरिकांना दुर्बिणीद्वारे ही घटना पाहता येईल, असे औंधकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Jupiter-Saturn alliance on December 21