जमादार चतुर्भुज
By Admin | Updated: June 28, 2014 01:17 IST2014-06-28T00:03:54+5:302014-06-28T01:17:49+5:30
उमरी : उमरी पोलिस ठाण्याचे जमादार भानुदास लोभाजी वैद्य यांना २७ जून रोजी ६ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़ पोलिस निरीक्षकाच्या कक्षात
जमादार चतुर्भुज
उमरी : उमरी पोलिस ठाण्याचे जमादार भानुदास लोभाजी वैद्य यांना २७ जून रोजी ६ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़ पोलिस निरीक्षकाच्या कक्षातच हा प्रकार घडला़ या घटनेमुळे उमरी ठाणे नांदेड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे़
उमरी, जि़ नांदेड येथील पोलिस निरीक्षक विठ्ठल चव्हाण यांनी ३० हजार रुपये लाचेची मागणी केल्यावरून त्यांच्याविरूद्ध २५ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला़ तीन दिवस उलटत नाहीत तोच याच ठाण्यातील जमादार ६ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले़ बल्लाळ ता़ भोकर येथील तक्रारदाराचा मुलगा याच्याविरूद्ध उमरी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे़ यामध्ये तुझ्या मुलाला अटक करीत नाही व कोठडीत टाकत नाही, म्हणून जमादार वैद्य यांनी तक्रारदारास ६ हजार रुपयांची मागणी केली़ विशेष म्हणजे एसीबी नांदेडच्या पथकाने सदर ६ हजारांची लाच स्वीकारताना ठाण्यातील पोलिस निरीक्षकाच्या कक्षातच वैद्य यांना रंगेहाथ पकडले़
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक एम़जी़ पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जी़ एस़ राहिरे, जमादार चंद्रकांत कदम, विठ्ठल खोमणे, शेख चांद व चालक कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली़ (वार्ताहर)
पोलिस निरीक्षकाच्या कक्षातच लाच घेताना पकडले
२५ जून रोजी पोलिस निरीक्षक विठ्ठल चव्हाण यांना लाच घेताना पकडले होते
उमरी पोलिस ठाणे आले चर्चेत
अटक न करण्यासाठी पोलिस जमादाराने घेतली ६ हजारांची लाच
तपास सुरु