महात्मा बसवेश्वरांची जयंती उत्साहात

By Admin | Updated: April 22, 2015 00:40 IST2015-04-22T00:33:05+5:302015-04-22T00:40:22+5:30

लातूर : महात्मा बसवेश्वरांची जयंती मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली़ सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबीर, मोटारसायकल रॅली काढण्यात आली़

Jupiter jubilee of Mahatma Basaveshwar | महात्मा बसवेश्वरांची जयंती उत्साहात

महात्मा बसवेश्वरांची जयंती उत्साहात


लातूर : महात्मा बसवेश्वरांची जयंती मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली़ सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबीर, मोटारसायकल रॅली काढण्यात आली़ सायंकाळी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली़ ढोल-ताशा व लेझीम पथक तसेच उंट, हत्ती, घोडेस्वार मिरवणुकीत सहभागी झाले होते़ चौकाचौकांत लेझीम पथकांचे सादरीकरण आणि देखाव्याने लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले़ औसा रोड व गाव भागातून मिरवणुका रात्री उशिरापर्यंत बसवेश्वर चौकात विसर्जीत झाल्या़ यावेळी विविध संस्था, संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी महात्मा बसवेश्वरांच्या अश्वरुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले़ महात्मा बसवेश्वरांच्या जयघोषाने सिद्धेश्वर नगरी दुमदुमली़
महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने सकाळी ८ वाजता बसवेश्वर गल्ली आझाद चौक येथे महारुद्राभिषेक करण्यात आले़ ९ वाजता कव्हा नाका येथील महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारुढ पुतळ्यास आ़अमित देशमुख, आ़बस्वराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले़ तद्नंतर आ़ अमित देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले़ प्रास्ताविक रमेशअप्पा हालकुडे यांनी केले़ सुत्रसंचालन रमाकांत पंचाक्षरी व ओमप्रकाश झुरळे यांनी केले़ आभार राजकुमार नाईकवाडे यांनी मानले़ यावेळी महापौर अख्तर मिस्त्री, उपमहापौर कैलास कांबळे, माजी महापौर स्मिता खानापूरे, मोईज शेख, बी़व्ही़ मोतीपवळे, डॉ़मन्मथ भातांब्रे, एस़एस़पाटील, पूजा पंचाक्षरी यांच्यासह महानगरपालिकेतील नगरसेवक उपस्थित होते़
शहरातील आदर्श कॉलनी येथे महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त भव्य मंडप उभारण्यात आले आहे़ येथून बसवेश्वर महाविद्यालयापर्यंत सायंकाळी ६ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली़ उद्घाटन आ़अमित देशमुख यांच्या हस्ते झाले़ यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते़

Web Title: Jupiter jubilee of Mahatma Basaveshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.