जि़प़ उद्यानातील भंगार गायब
By Admin | Updated: September 6, 2015 23:58 IST2015-09-06T23:50:41+5:302015-09-06T23:58:16+5:30
लातूर : लातूर जिल्हा परिषदेच्या उद्यान सुशोभीकरणात जुन्या ४ बाय ६ च्या जाळ्या काढून नवीन संरक्षण भिंत बांधण्यात आली़

जि़प़ उद्यानातील भंगार गायब
लातूर : लातूर जिल्हा परिषदेच्या उद्यान सुशोभीकरणात जुन्या ४ बाय ६ च्या जाळ्या काढून नवीन संरक्षण भिंत बांधण्यात आली़ या बांधकामात निघालेल्या भंगारच्या जाळ्या व इतर लाखो रुपयांचे साहित्य गायब झाले आहे़ याबाबत जि़ प़ सदस्यांनी संशय व्यक्त केला आहे़ भंगार जाळ्याचे नेमके काय केले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे़
जिल्हा परिषदेच्या उद्यानात सुशोभीकरणासाठी उद्यान परिसरातील जुनी लोखंडी जाळी असलेली संरक्षण भिंत पाडून नवीन संरक्षण भिंत बांधण्यात आली़ या जुन्या भिंतीत ४ बाय ६ लोखंडी जाळ्या अशा १०० ते २०० जाळ्या व त्यासोबत त्या भिंतीचे निघालेले अन्य साहित्य, गेट असे लाखो रुपयांचे भंगार गायब झाले आहे़ साहित्य नेमके कुठे गेले याबाबतची माहिती कुणालाच नाही़ त्यामुळे जि़प़तील भाजपाचे गटनेते रामचंद्र तिरुके यांनी भंगार साहित्य कुठे गेले आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे़ दरम्यान, उद्यानाच्या लोखंडी जाळ्या व इतर साहित्याची माहिती घेण्यासाठी बांधकाम सभापती सपना घुगे यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला असता, त्या संपर्क कक्षाबाहेर असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शेकला नाही़