दिंडीतून स्वच्छतेचा जागर
By Admin | Updated: June 23, 2014 00:21 IST2014-06-22T22:57:28+5:302014-06-23T00:21:20+5:30
बीड: आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे राज्यभरातून दिंड्या जातात़ बीडमधून देखील पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने दिंडी काढण्यात येणार असून जनजागृती केली जाणार आहे़

दिंडीतून स्वच्छतेचा जागर
बीड: आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे राज्यभरातून दिंड्या जातात़ बीडमधून देखील पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने दिंडी काढण्यात येणार असून जनजागृती केली जाणार आहे़
२३ जून रोजी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयातून संत तुकाराम यांची पालखी पंढरपूरकडे रवाना होत आहे़ या पालखीसोहळ्यात बीड येथील स्वच्छता दिंडी सहभागी होत आहे़ त्यासाठी एक चित्ररथ तयार करण्यात आला आहे़ शाहीर दिलीप शिंदे, सिद्धेश्वर शिंदे, तुकाराम काळे, विलास जाधव, विलास काटे, सुभाष ठोंबरे यांचे कलापथक जनजागृती करणार आहे़ संवाद तज्ज्ञ सचिन बन्सोडे सोबत राहणार आहेत़
पाणी, स्वच्छता व पर्यावरण याबाबत मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती निर्मल भारत अभियानचे कार्यक्रम व्यवस्थापक एस़ बी़ वाघमारे यांनी दिली़ (प्रतिनिधी)