नोकरीच्या आमिषाने मेहुणीवर बलात्कार
By Admin | Updated: June 14, 2017 14:56 IST2017-06-14T14:55:52+5:302017-06-14T14:56:46+5:30
सिडको भागातील महाविद्यालयात बी. कॉम. चं शिक्षण घेणार्या 20 वर्षीय मेहुणीवर नोकरीचे आमिष दाखवत तिच्याच मेहुण्याने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे

नोकरीच्या आमिषाने मेहुणीवर बलात्कार
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 14- सिडको भागातील महाविद्यालयात बी. कॉम. चं शिक्षण घेणार्या 20 वर्षीय मेहुणीवर नोकरीचे आमिष दाखवत तिच्याच मेहुण्याने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
शांतीलाल गोरक्ष खताळ असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पीडित मुलगी आडगावची रहिवासी आहे. ती सध्या सिडको परिसरातील एका महाविद्यालयात बी.कॉम.चं शिक्षण घेते आहे. तिच्या मोठ्या बहिणीचा विवाह माळीवाडी येथील शांतीलाल खताळ याच्यासोबत झाला होता. तो सध्या पुण्यातील हडपसर येथे एका खाजगी कंपनीत कामाला आहे. पीडितेची बहिणही याच ठिकाणी नोकरी करते. १९ एप्रिल रोजी पीडितेच्या बहिणीला आरोपीने माळीवाडी या गावी नेऊन सोडलं. त्यानंतर तो कार घेऊन औरंगाबादला गेला होता. आरोपी हा पीडित मुलीच्या कायम संपर्कात होता.
आरोपी पीडित महिलेला पुणे येथील बँकेत नोकरी लावतो, असं आमिष दाखवित असत. १९ एप्रिल रोजी त्याने तिला पुण्यात तुला नोकरीला लावून देतो, असं सांगून गावाजवळील फाट्यावर बोलावून घेतले. पुण्यात बहिणीच्याच घरी जायचं असल्याने तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. पुणे येथे नेल्यानंतर आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. २६ एप्रिलपर्यंत त्याचं हे कृत्य सुरू होतं. विशेष म्हणजे ही बाब कोणाला सांगितल्यास तुझी बदनामी होईल आणि पोलिसांत तक्रार दिल्यास तुझ्या बहिणीला मी सोडून देईन, धमकी त्याने दिली. या नंतर पीडित मुलगी गावी परतली. दरम्यान तो आरोपी पीडितेला सतत फोन करून त्रास देत होता. आरोपीच्या या त्रासाला कंटाळून पीडितेने १२ जून रोजी चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरिक्षक ताईतवाले यांनी घटनेची चौकशी करण्यासाठी एक पथक पुण्याला पाठवलं होतं. पोलिसांच्या या पथकाने २४ तासात आरोपी खताळ याला अटक केली.