चार वर्षांच्या मुलीसह मातेची विहिरीत उडी
By Admin | Updated: September 4, 2014 00:52 IST2014-09-04T00:32:20+5:302014-09-04T00:52:57+5:30
सिल्लोड : सिल्लोड तालुक्यातील भवन येथील विवाहितेने सासरच्या छळास कंटाळून चार वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली.

चार वर्षांच्या मुलीसह मातेची विहिरीत उडी
सिल्लोड : सिल्लोड तालुक्यातील भवन येथील विवाहितेने सासरच्या छळास कंटाळून चार वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी पती, सासू, सासरा यांच्याविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याविषयीची माहिती अशी की, विवाहिता शीला बाळू कळम (२३) ही सासरच्या छळास कंटाळून मंगळवारपासून घरातून तनुश्री बाळू कळम (४ वर्षे) मुलीसह घराबाहेर निघून गेली. त्यानंतर तिने एका विहिरीत उडी घेऊन मुलीसह आपले जीवन संपविले.
तिच्या मृत्यूला हे तिघे जबाबदार असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे, अशी माहिती पोलिसांना दिली. डी.वाय.एस.पी. राम मांडुरके व सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी घटनास्थळाला भेट दिली.