जोगेश्वरवाडीत दारूबंदीचा ठराव

By Admin | Updated: July 4, 2014 00:18 IST2014-07-03T23:28:30+5:302014-07-04T00:18:37+5:30

जामखेड : अंबड तालुक्यातील जोगेश्वरवाडी येथील ग्रामस्थांनी गावातील अवैध दारू विक्रीची दुकाने बंद करून, गावात दारू बंदी करण्यासाठीचा एकमुखी ठराव करून त्याची प्रत पोलिसांना दिली आहे.

Judge's verdict in Jogeshwarwadi | जोगेश्वरवाडीत दारूबंदीचा ठराव

जोगेश्वरवाडीत दारूबंदीचा ठराव

जामखेड : अंबड तालुक्यातील जोगेश्वरवाडी येथील ग्रामस्थांनी गावातील अवैध दारू विक्रीची दुकाने बंद करून, गावात दारू बंदी करण्यासाठीचा एकमुखी ठराव करून त्याची प्रत पोलिसांना दिली आहे. आता पोलिस या प्रकरणी काय कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
गावात मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या दारू विक्रीची दुकाने थाटलेली आहे. त्यामुळे गावातील लहानापासून मोठ्यापर्यंत दारूच्या आहारी जात आहेत. कोवळ्या वयातील मुलेही दारूच्या व्यसनाकडे वळत असल्याने त्यांचे भविष्यात दुष्परिणाम होतील. तसेच दारूमुळे महिला वर्गालाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गावात भांडण तंटे होत आहेत. हा दररोजचाच त्रास म्हणून गावातील महिलांनी ग्रामपंचायतीकडे दारूबंदीसाठी मागणी केली होती. त्यानुसार सरपंच बेबी चव्हाण, उपसरपंच मीराबाई जाधव यांनी पुढाकार घेतला. सर्व ग्रामस्थांसह ग्रामसेवक जी. के बनसोडे या सर्वांनी मिळून दारूबंदीचा ठराव घेतला. त्यावर ग्रामस्थांनी सह्या करून अंबड पोलिस ठाण्यात तो ठराव सादर करून संबधीतांवर कारवाई करून गावात दारूबंदीची मागणी केली.
सरंपच बेबी चव्हाण म्हणाल्या की,गावात दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे गावात दारूबंदी गरजेची आहे. गीताबाई जाधव म्हणाल्या की दारूमुळे घरात भांडणे होत आहेत. महिलांना , लहान मुलांना त्याचा मोठा त्रास होतो. मुलांवर त्याचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे दारू बंदी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. (वार्ताहर)
पोलिसांकडून आश्वासन
दारूबंदीच्या मागणीचा ठराव घेऊन आलेल्या महिलांना व ग्रामस्थांना अंबड पोलिस ठाण्याचे पो.नि.आघाव यांनी गावातील सर्व अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title: Judge's verdict in Jogeshwarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.