शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

न्याय मिळवून देण्यासाठी न्यायाधीश आणि वकिलांनी कसोशीने प्रयत्न करावेत: न्या. मनीष पितळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 19:26 IST

औरंगाबाद खंडपीठाचा ४५ व्या वर्धापन दिन: कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेमुळे आता औरंगाबाद खंडपीठ हे ज्येष्ठ खंडपीठ झाले

छत्रपती संभाजीनगर : राज्यघटनेला अभिप्रेत असलेला न्याय पक्षकारांना मिळवून देण्यासाठी न्यायाधीश आणि वकिलांनी कसोशीने प्रयत्न करणे हे आद्य कर्तव्य आहे. वकील आणि न्यायाधीशांमधील योग्य समन्वयानेच हे साध्य होऊ शकते, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी केले.

औरंगाबाद खंडपीठाच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित खंडपीठ वकील संघातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी न्या. विभा कंकणवाडी होत्या. व्यासपीठावर वकील संघाच्या अध्यक्षा ॲड. योगिता थोरात, उपाध्यक्ष ॲड. संदीपान मोरमपल्ले, सचिव ॲड. श्रीकृष्ण चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमास न्या. किशोर संत, न्या. अरुण पेडणेकर, न्या. वाय. जी. खोब्रागडे, न्या. शैलेश ब्रम्हे, न्या. संजय देशमुख, न्या. निरज धोटे, न्या. एस. एम. घोडेस्वार, निवृत्त न्या. एस. बी. देशमुख आदींचीही उपस्थिती होती.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. ॲड. शशीकुमार चौधरी, ॲड. सुखदेव शेळके यांचा खंडपीठाच्या स्थापनेसाठी योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात योगिता थोरात, सुखदेव शेळके, ज्येष्ठ विधिज्ञ प्रवीण मंडलिक, ॲड. अमोल सावंत, ॲड. वसंतराव साळुंके, ॲड. नरसिंह जाधव, ज्येष्ठ विधिज्ञ पी. आर. कातनेश्वरकर आदींनी समयोचित मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्षा पूनम बोडखे पाटील यांनी केले. सचिव श्रीकृष्ण चौधरी यांनी आभार मानले.

औरंगाबाद खंडपीठ हे आता ज्येष्ठ खंडपीठ झालेन्या. पितळे पुढे म्हणाले, वर्धापन दिन हा आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. न्यायदान प्रक्रियेत वकिलाची भूमिका मदतनीस म्हणून आणि न्यायाधीशाची भूमिका, केवळ त्याच्यासमोरील खटल्यात एक निष्पक्ष आणि निर्भय मध्यस्थ म्हणूनच नव्हे तर पक्षकारांना जलद न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणारी असली पाहिजे, असेही ते म्हणाले. न्या. विभा कंकणवाडी यांनी अध्यक्षीय समारोपात कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेमुळे आता औरंगाबाद खंडपीठ हे ज्येष्ठ खंडपीठ झाले असून, तशीच जबाबदारीही वाढली असल्याचे म्हटले. या खंडपीठातून घडलेले अनेक वकील उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तिपदी विराजमान झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर