शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जि.प.मध्ये मद्यधुंद वकिलाचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:27 AM

मद्याच्या नशेत तर्र असलेल्या एका वकिलाने गुरुवारी रात्री ७.३० ते ८ वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेत धुमाकूळ घातला. अधिकारी- पदाधिकाºयांच्या दालनात जाऊन अर्वाच्य शिवीगाळ करीत त्याने दिवे बंद केले. विशेष म्हणजे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांच्या दालनात जाण्यापूर्वी त्याने सर्व दिवे बंद केले व तो दालनात गेला. अचानक दिवे बंद झाले व एक अज्ञात व्यक्ती दालनात शिरलेला बघून मंजूषा कापसे यांनी आरडाओरड करीत दालनाबाहेर धूम ठोकली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मद्याच्या नशेत तर्र असलेल्या एका वकिलाने गुरुवारी रात्री ७.३० ते ८ वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेत धुमाकूळ घातला. अधिकारी- पदाधिकाºयांच्या दालनात जाऊन अर्वाच्य शिवीगाळ करीत त्याने दिवे बंद केले. विशेष म्हणजे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांच्या दालनात जाण्यापूर्वी त्याने सर्व दिवे बंद केले व तो दालनात गेला. अचानक दिवे बंद झाले व एक अज्ञात व्यक्ती दालनात शिरलेला बघून मंजूषा कापसे यांनी आरडाओरड करीत दालनाबाहेर धूम ठोकली.झाले असे की, सायंकाळनंतर जिल्हा परिषदेत बºयापैकी नीरव शांतता असते. कर्मचारी निघून गेलेले असतात. काही पदाधिकारी व अधिकारी मात्र कार्यालयीन कामकाज करीत दालनात बसलेले असतात. आजही नेहमीसारखे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष हे दालनामध्ये फायलींचा निपटारा करण्यात व्यग्र होते. तेव्हा पारखे नावाचा एक वकील मद्यधुंद अवस्थेत जिल्हा परिषदेत आला. तो सर्वप्रथम उपाध्यक्ष केशव तायडे यांच्या दालनात गेला व जोरजोरात ओरडत दालन बंद करा, बाहेर निघा, दिवे बंद करा, ही कार्यालयीन कामकाज करण्याची वेळ आहे का, असे म्हणत गोंधळ घालत होता.तेवढ्यात तेथील काही कर्मचाºयांनी त्याला हुसकावून लावले. तो पुढे कापसे यांच्या दालनाकडे गेला. तेथे त्याने गोंधळ घालत कार्यालयातील दिवे बंद केले व तो आत गेला. अचानक घडलेला हा प्रकार पाहून कापसे ओरडतच कार्यालयाबाहेर गेल्या. हा प्रकार पाहून आजूबाजूच्या कर्मचाºयांनी तिकडे धाव घेतली व त्याला धमकावत कार्यालयाबाहेर काढले. तेथून तो पुढे अध्यक्षांच्या कार्यालयाकडे गेला. तेथेही त्याने असाच प्रकार केला. त्यामुळे अधिकारी- पदाधिकारी व त्यांच्या कर्मचाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे जाऊन सदरील मद्यधुंद वकिलाविरोधात पोलीस कारवाई करण्याची मागणी केली.तक्रार देण्यास नकारघडलेल्या प्रसंगाबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तो होऊ शकला नाही. त्यानंतर यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा ते म्हणाले की, जिल्हा परिषदेत रात्रीच्या वेळी एका वकिलाने गोंधळ घातला. घडलेला प्रकार हा विचित्र होता. त्या वकिलाचा आणि जि.प.चा काडीचाही संबंध नाही, तरी त्याने अशा प्रकारे प्रदर्शन केले. त्याच्याविरुद्ध कापसे यांनी पोलिसांत तक्रार देण्यास नकार दिला आहे.