‘एक्झिट पोल’मुळे भाजपात आनंद

By Admin | Updated: May 13, 2014 00:59 IST2014-05-13T00:22:15+5:302014-05-13T00:59:53+5:30

औरंगाबाद : मतदानाचे सर्व टप्पे संपताच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी निकालाचे अंदाज (एक्झिट पोल) घोषित करणे सुरू करताच भाजपाच्या गोटात आनंद पसरला.

Joy of the BJP due to exit polls | ‘एक्झिट पोल’मुळे भाजपात आनंद

‘एक्झिट पोल’मुळे भाजपात आनंद

औरंगाबाद : मतदानाचे सर्व टप्पे संपताच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी निकालाचे अंदाज (एक्झिट पोल) घोषित करणे सुरू करताच भाजपाच्या गोटात आनंद पसरला. तर काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी चार दिवस थांबा व थेट निकालच ऐका, असा सावध पवित्रा घेतला. ९ व्या टप्प्यातील मतदान सहा वाजता संपले व दूरचित्रवाण्यांनी आपापल्या पाहणीचे अंदाज घोषित करणे सुरू केले. या अंदाजामध्ये सर्वच चॅनल्सने ‘मोदी लहर’वर शिक्कामोर्तब करून भाजपाप्रणीत आघाडीला २९० जागांपर्यंत पोहोचविले. तर काँग्रेसला १०० जागांच्या आतच रोखले. त्यामुळे एनडीएच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. अपेक्षितच होते केंद्रात सत्ता परिवर्तन अपेक्षितच होते. नरेंद्र मोदी यांनी अगदी सुरुवातीलाच हा अंदाज व्यक्त केला होता. तो खरा ठरणार आहे. देशभरात बदलाचे वातावरण होते. त्या वातावरणाला साजेसा निकाल लागणार याबद्दल आम्ही निश्ंिचत आहोत. फक्त भाजपाच्या जागा २७२ हून अधिक येतील, असा आम्हाला विश्वास आहे. शिरीष बोराळकर, प्रदेश प्रवक्ते, भाजपा शेवटी हे अंदाजच शेवटी हे अंदाजच आहेत. त्यावर पूर्ण विश्वास ठेवता येत नाही. माध्यमांनी सातत्याने वर्तविलेले अंदाज चुकले आहेत. यावेळेसही त्याची पुनरावृत्ती होईल. केशवराव औताडे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस त्रिशंकू परिस्थिती होईल माध्यमांनी वर्तविलेले पाहणी अंदाज काहीअंशी बरोबर आहेत. त्यात काँग्रेस आघाडीच्या जागा घटणार हे निश्चित; परंतु भाजपा आघाडीला अवास्तव महत्त्व दिले जात आहे. त्यांना बहुमत मिळणार नाही. यूपी, ओरिसा, प. बंगाल, तामिळनाडू आदी राज्यांत प्रादेशिक पक्षांना अधिक जागा मिळणार आहेत, त्यामुळे केंद्रात नवी समीकरणे तयार होऊ शकतात. प्रा. अविनाश डोळस, भारिप-बहुजन महासंघ

Web Title: Joy of the BJP due to exit polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.