एशियाड'चा प्रवास अधिक आरामदायक

By Admin | Updated: October 22, 2015 21:00 IST2015-10-22T21:00:24+5:302015-10-22T21:00:24+5:30

बसगाड्यांमधील मागे-पुढे होणारी आसन व्यवस्था आणि त्यावर प्रवाशांना झोप काढता येणारी सुविधा म्हटली की, खाजगी बसगाड्याच नजरेसमोर येतात

The journey of the Asiad is more comfortable | एशियाड'चा प्रवास अधिक आरामदायक

एशियाड'चा प्रवास अधिक आरामदायक

. औरंगाबाद : बसगाड्यांमधील मागे-पुढे होणारी आसन व्यवस्था आणि त्यावर प्रवाशांना झोप काढता येणारी सुविधा म्हटली की, खाजगी बसगाड्याच नजरेसमोर येतात. परंतु आता एस. टी. महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत पुशबॅक आसन व्यवस्था असणार्‍या २३७ एशियाड बसेसची बांधणी केली जात आहे. त्यामुळे नव्या वर्षात एशियाड बसेसचा प्रवास अधिक आरामदायक होणार आहे.
वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर पुशबॅक आसन व्यवस्था राहणार्‍या एशियाड बसेसची बांधणी करण्यास मंजुरी मिळाली आणि त्याचे प्रत्यक्षात कामही सुरू झाले.
या बसगाड्यांची बांधणी करण्यासाठी चेसीसची खरेदी करण्यात आली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर, अशा तीन महिन्यांच्या कालावधीत चिकलठाणा येथील मध्यवर्ती कार्यशाळेत २३७ एशियाड बसगाड्या टप्प्याटप्प्याने बांधण्यात येणार आहेत.
३५ आसन क्षमता
पुशबॅक आसन व्यवस्थेमुळे एशियाड बसगाड्यांमधील आसन संख्येत घट होणार आहे. या नव्या बसगाड्यांमध्ये ३५ प्रवाशांची आसन क्षमता राहणार आहे. आसन क्षमतेत घट होणार असल्याने त्यास मंजुरी मिळण्यास विलंब होत आहे. परंतु आरामदायक प्रवासामुळे प्रवाशांचा या बसगाड्यांना प्रतिसाद वाढेल, या अपेक्षेने त्यास अखेर मंजुरी देण्यात आली. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत २३७ एशियाड बसेसची बांधणी केली जाणार आहे. गाड्यांची बांधणी करण्यासाठी चेसीस खरेदी करण्यात आल्या आहेत. या सर्व बसगाड्यांमध्ये पुशबॅक आसन व्यवस्था राहणार आहे.
- जे. पी. चव्हाण, कार्यशाळा व्यवस्थापक, चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळा, एस. टी. महामंडळ तीन महिन्यांत बांधणी

Web Title: The journey of the Asiad is more comfortable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.