पत्रकाराची आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:51 IST2017-09-22T00:51:17+5:302017-09-22T00:51:17+5:30
येथील पत्रकार जगदीश बेदरे यांच्या आत्महत्येने शहरात खळबळ उडाली होती. त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीवरून माजी नगरसेवकासह अन्य एकावर गुन्हा दाखल झाला आहे

पत्रकाराची आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : येथील पत्रकार जगदीश बेदरे यांच्या आत्महत्येने शहरात खळबळ उडाली होती. त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीवरून माजी नगरसेवकासह अन्य एकावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गुरूवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर त्यांना ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पत्रकार बेदरे यांनी बुधवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळुन आली होती. प्लॉट खरेदी विक्रीच्या व्यवहारातुन लोकांच्या रजिस्ट्रि व कमिशन पोटी देवु केलेला प्लॉट गेवराई येथील माजी नगरसेवक दादासाहेब घोडके व कृष्णा मुळे देत नाहीत व मागणी केल्यास जिवे मारण्याच्या धमक्या देतात, अशी माहिती बेदरे यांनी वडील व भावंडांना काही दिवसांपुर्वी दिली होती. ताकडगाव रोड व सोनवाडी परिसरात दादासाहेब घोडके व कृष्णा मुळे याचे प्लॉट हप्त्यावर विक्री करून पैसे जमा केले होते. अनेकवेळा रजिस्ट्रिची मागणी करूनही ते करून देत नव्हते. त्यामुळे माझ्या भावाने आत्महत्या केली, अशी फिर्याद जगदीश यांचा भाऊ अनिल बेदरे यांनी गेवराई पोलीस ठाण्यात दिली आहे. यातील कृष्णा मुळे याला अटक केली असून चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दादासाहेब घोडके हा फरार आहे. तपास पोलीस निरिक्षक सुरेश बुधवंत हे करीत आहेत.