जोंधळे यांना राष्ट्रपती पदक
By Admin | Updated: August 17, 2015 00:06 IST2015-08-17T00:06:32+5:302015-08-17T00:06:32+5:30
आखाडा बाळापूर : पोलिस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल आखाडा बाळापूर ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अशोक शेषेराव जोंधळे यांना २०१५ सालचे राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे.

जोंधळे यांना राष्ट्रपती पदक
आखाडा बाळापूर : पोलिस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल आखाडा बाळापूर ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अशोक शेषेराव जोंधळे यांना २०१५ सालचे राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदकाचा बहुमान मिळाला आहे.
बाळापूर पोलिस ठाण्यात मागील दोन वर्षापासून कार्यरत असलेले फौजदार अशोक जोंधळे यांना यापुर्वीही उत्कृष्ट कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २००२ साली विशेष सेवा पदक, २००५ साली पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह, २००६ साली गुणवत्तापुर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक, २०१० साली आंतरिक सुरक्षा पदक मिळाले आहे. ३०० बक्षिसे आणि तेवढीच प्रशस्तीपत्रे मिळविणारे जोंधळे २०१३ साली पोलिस उपनिरीक्षक झाले. १९८२ साली पोलिस दलात दाखल झालेल्या अशोक जोंधळे यांना पोलिस दलातील गुणवत्तापुर्ण उल्लेखनिय कामासाठी २०१५ सालचे राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्याचे रहिवासी असलेल्या जोंधळे यांचा या सन्मानाबद्दल पोलिस अधीक्षक कैलास कणसे, सहा पोलिस अधीक्षक नामदेव मिठ्ठेवाड, सपोनि पंडित कच्छवे यांनी सत्कार केला आहे. (वार्ताहर)