जोक
By | Updated: December 4, 2020 04:08 IST2020-12-04T04:08:58+5:302020-12-04T04:08:58+5:30
ती त्याला म्हणाली, ‘ते बघ... ते झाड !!’ आणि त्याच्या मनात अनेक रोमँटिक गोष्टी जाग्या झाल्या. त्याला तेवढा इशारा ...

जोक
ती त्याला म्हणाली, ‘ते बघ... ते झाड !!’
आणि त्याच्या मनात अनेक रोमँटिक गोष्टी जाग्या झाल्या.
त्याला तेवढा इशारा पुरेसा होता..
लग्नानंतर...
ती त्याला म्हणाली, ‘ते बघ... ते झाड!!’
आणि
मुकाट्याने त्याने...
कोपऱ्यातला झाडू उचलला आणि खोलीतला केर तो झाडू लागला! त्याला तेवढा इशारा पुरेसा होता..
--------------------
गोळयांची कमाल...
गावच्या मेडिकल स्टोअरमध्ये घडलेला किस्सा...
एक आज्जी मेडिकलमध्ये आल्या.
आज्जी : बाळा!! चिट्टीत लिवलेल्या गोळ्या दे रं ...
दुकानदार : आज्जी गोळी जेवणाअगोदर आर्धा तास घ्यावी लागेल...
आजी : घड्याळ कळत नाही रं.. आणि पोरं बी घरी नाईत...
दुकानदार : राणा दा बघता का?
आज्जी : व्हय! बघती की...
दुकानदार : मग राणा दा आला की गोळी खा... आणि शनाया आली की जेवा..
-----------------
चहा...
मुलगा - मला काटकसर करणारी मुलगी हवी आहे.
.
.
मुलगी - मी मुस्कान बिस्किटाच्या वरची साखर वापरून चहा करते.
.
.
स्थळ - सांगायची गरज आहे?
----------------