जोक

By | Updated: November 30, 2020 04:00 IST2020-11-30T04:00:07+5:302020-11-30T04:00:07+5:30

वडील : बाहेर ये, आकाशाकडे बोट दाखवून ते काय आहे बघ. बाब्या : पप्पा तो चंद्र आहे वडील : ...

Joke | जोक

जोक

वडील : बाहेर ये, आकाशाकडे बोट दाखवून ते काय आहे बघ.

बाब्या : पप्पा तो चंद्र आहे

वडील : नालायक, मग याच्यापेक्षा लांब काय स्वर्गातल्या अप्सरा बघतो का आता..

---------------

पांघरूण...

विज्ञानाचा तास सुरू होता.

मास्तरांनी प्रश्न विचारला..

शास्त्रीय कारणे द्या, डोक्यावर पांघरुण घेऊन का झोपू नये?

बंडूने दिमाखात उत्तर दिलं,

.

.

.

बंडू - कारण, कोण झोपलंय ते कळत नाही

मास्तरांनी बंडू पांघरूणात घालून बदाबदा बडवला..

----------------

हॉटेल्सही बंद...

बायको बरोबर भांडण झाल्यानंतर रमेशनं घर सोडण्याचा निर्णय घेतला..

घराच्या बाहेर आल्यानंतर रमेशची सुरेशसोबत भेट झाली.

रमेशला वैतागलेला पाहून सुरेशनं विचारपूस केली.

रमेशने बायकोसोबत वाद झाल्याचं सांगितलं.

सुरेश रमेशला म्हणाला,

अरे बाबा.. बायकोशी नीट वाग.

हॉटेल्स व रेस्टाॅरंट बंद झाले आहेत, सगळा भारत बंद आहे, नाहीतर उपाशी मरावं लागेल.

Web Title: Joke