जि़प़सदस्यांनी घेतली शिक्षणाधिकाºयांची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:22 IST2017-08-06T00:22:09+5:302017-08-06T00:22:09+5:30

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या, गणवेश वाटपातील दिरंगाई, वर्गखोल्या, शिक्षकांच्या रिक्त जागा आदी प्रश्नांची सरबत्ती करीत जिल्हा परिषद सदस्यांनी शिक्षण विभाग आणि शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांना धारेवर धरले़ काम करायची इच्छा नसेल तर शिक्षण विभाग सोडून द्या, मात्र जिल्ह्यातील शिक्षणाचे वाटोळे करू नका, असा सल्लादेखील काही सदस्यांनी दिला़

Joint education students took education school | जि़प़सदस्यांनी घेतली शिक्षणाधिकाºयांची शाळा

जि़प़सदस्यांनी घेतली शिक्षणाधिकाºयांची शाळा

श्रीनिवास भोसले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या, गणवेश वाटपातील दिरंगाई, वर्गखोल्या, शिक्षकांच्या रिक्त जागा आदी प्रश्नांची सरबत्ती करीत जिल्हा परिषद सदस्यांनी शिक्षण विभाग आणि शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांना धारेवर धरले़ काम करायची इच्छा नसेल तर शिक्षण विभाग सोडून द्या, मात्र जिल्ह्यातील शिक्षणाचे वाटोळे करू नका, असा सल्लादेखील काही सदस्यांनी दिला़
शनिवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जि़प़ची सर्वसाधारण सभा पार पडली़ यावेळी जि़प़ सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, प्रकाश देशमुख, पूनम पवार, मंगाराणी अंबुलगेकर, दशरथ लोहबंदे यांच्यासह अनेक सदस्यांनी शिक्षण विभागामध्ये कोणतीच कामे वेळेत होत नसून शिक्षणाधिकाºयांना शाळांना भेटी द्यायलाही फुरसत मिळत नाही, अशा तक्रारी केल्या़ यानंतर शिक्षण विभागातील प्रलंबित कामे आणि प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलावण्याची मागणी केली़ त्यानंतर जि़ प़ अध्यक्ष शांताबाई पवार जवळगावकर यांनी ८ सप्टेंबर रोजी विशेष सभा घेण्याचा निर्णय घेतला़ या सभेस शिक्षणाधिकारी यांनी स्वत: हजर राहण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी यांनी यावेळी दिले़
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आपसी बदल्या, आंतरजिल्हा बदल्या, पती-पत्नी एकत्रीकरणातील बदल्या नियमानुसार झाल्या नाहीत, १२० पैकी ८६ शिक्षकांना पदस्थापना चुकीच्या पद्धतीने दिली, त्याचबरोबर जिल्ह्यातील २१५ अवघड क्षेत्र निवड करताना सभापती, सदस्यांना माहिती दिली नाही, शिक्षक उपस्थित असूनदेखील त्यांना १५ दिवसांपर्यंत गाव देण्यात आले नाही, मोफत पुस्तके आणि गणेवश आजपर्यंत विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत, मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या रिक्त जागांचा प्रश्न सुटत नाही आदी प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले़

Web Title: Joint education students took education school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.