गणवेशासाठी हवे विद्यार्थ्याचे संयुक्त खाते
By Admin | Updated: June 11, 2017 00:47 IST2017-06-11T00:45:59+5:302017-06-11T00:47:37+5:30
औरंगाबाद : गणवेशाची रक्कम मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना आता बँकेत आईसोबत संयुक्त खाते उघडावे लागणार आहे.

गणवेशासाठी हवे विद्यार्थ्याचे संयुक्त खाते
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गणवेशाची रक्कम मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना आता बँकेत आईसोबत संयुक्त खाते उघडावे लागणार आहे. बँकेत शून्य पैशात बँक खाते उघडले जात असले तरी विद्यार्थ्याच्या खात्यावर मात्र, हजार- पाचशे रुपयांची रक्कम कायम शिल्लक असणे गरजेचे आहे, असा बँकेचा दंडक असल्यामुळे ‘उपचार नको, आजारच बरा’ अशी अवस्था आता पालकांची झाली आहे.
यंदापासून सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थिनी तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना थेट गणवेश देण्याऐवजी गणवेशाची रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. एकूण चारशे रुपयांची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीयीकृत बँकेतील खात्यात जमा करण्यात येणार आहे. मात्र, विद्यार्थ्यास आपल्या आईसोबत संयुक्त बँक खाते उघडावे लागणार आहे. विविध शिष्यवृत्त्या, उपस्थिती भत्त्यासाठी काही विद्यार्थ्यांचे बँकेत अगोदरच खाते उघडलेले आहे; पण आता त्या खात्याला संयुक्त खात्यामध्ये रुपांतरित करावे लागणार आहे. खाते खोलण्यासाठी आपल्या पाल्यांसोबत गेलेल्या अनेक पालकांना बँक व्यवस्थापनाकडून प्रतिसाद मिळत नाही. शून्य ठेवीवर विद्यार्थ्यांचे खाते चालू ठेवण्यासाठी बँकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. परंतु खाते उघडण्यासच (पान २ वर)