शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

जॉन्सन, शहर पोलीस अ, गुडईअर उपांत्यपूर्व फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:44 AM

एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत जॉन्सन अँड जॉन्सनने ए.आय.टी. संघावर, ‘शहर पोलीस अ’ने मसिआ संघावर, तर गुडईअरने एनएचकेवर मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पहिल्या सामन्यात जॉन्सन अँड जॉन्सनने ५ बाद १९१ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून स्वप्नील खडसेने २ षटकार व १0 चौकारांसह ७४, प्रवीण क्षीरसागरने २ चौकार व ६ षटकारांसह ४९ धावा केल्या.

ठळक मुद्देशेख मुकीमची स्फोटक खेळी : स्वप्नील, ऋषिकेश सामनावीर

औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत जॉन्सन अँड जॉन्सनने ए.आय.टी. संघावर, ‘शहर पोलीस अ’ने मसिआ संघावर, तर गुडईअरने एनएचकेवर मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली.पहिल्या सामन्यात जॉन्सन अँड जॉन्सनने ५ बाद १९१ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून स्वप्नील खडसेने २ षटकार व १0 चौकारांसह ७४, प्रवीण क्षीरसागरने २ चौकार व ६ षटकारांसह ४९ धावा केल्या. ईशांत राय व विजय ढेकळे यांनी अनुक्रमे २९ व २५ धावांचे योगदान दिले. ए.आय.टी.जी.कडून दशवीरसिंह छाबडा व जीवन कांबळे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात ए.आय.टी.जी. ८ बाद १११ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून दशवीरसिंह छाबडाने नाबाद ३३ धावा केल्या. अक्षर अकूडने १९ धावा केल्या. जॉन्सन अँड जॉन्सनकडून सचिन सबनीस व ईशांत राय यांनी प्रत्येकी २, तर अनिरुद्ध पुजारी व हर्षद वैद्य यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.दुसऱ्या सामन्यात शहर पोलीस अ संघाने ६ बाद १८१ धावा केल्या. त्यांच्याकडून शेख मुकीमने ७१ चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह ९६ धावा केल्या. राहुल जोनवालने ३५ व सुदर्शन एखंडेने २७ धावा केल्या. मसिआकडून अतिक नाईकवाडेने ४४ धावांत ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात मसिआ संघ ७ बाद १२0 धावा केल्या. त्यांच्याकडून रोहन राठोडने ४0, अतिक नाईकवाडेने ३६ धावा केल्या. ‘शहर पोलीस अ’कडून मिलिंद भंडारीने २, तर मोहंमद इम्रान, राहुल जोनवाल व शेख जिलानी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.तिसºया सामन्यात गुडईअरविरुद्ध एनएचकेचा संघ ४७ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून अनिकेत म्हस्केने १४ व कैलास हजारेने १३ धावा केल्या. गुडईअरकडून ऋषिकेश नायरने ६ धावांत ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात गुडईअने विजयी लक्ष्य ७.५ षटकांत गाठले. त्यांच्याकडून ऋषिकेश नायरने २७ व अरविंद यादवने १९ धावा केल्या. एनएचकेकडून अनिल भवरने १ गडी बाद केला.येत्या शुक्रवारी सकाळी १0.३0 वाजता जॉन्सन वि. महावितरण अ, दुपारी २ वाजता गुडईअर व कम्बाईन बँकर्स यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळवण्यात येणार आहेत, असे संयोजक गंगाधर शेवाळे व दामोदर मानकापे यांनी कळवले आहे.