जोगवाडा - पंढरपूर पायी दिंडी
By Admin | Updated: June 23, 2014 00:19 IST2014-06-22T23:24:38+5:302014-06-23T00:19:18+5:30
परभणी : श्री क्षेत्र संत तुकाराम महाराज संस्थान यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी नथुराम बाबा केहाळकर यांच्या कृपाशिर्वादाने जोगवाडा ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा २६ जून रोजी निघणार आहे़

जोगवाडा - पंढरपूर पायी दिंडी
परभणी : जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथील श्री क्षेत्र संत तुकाराम महाराज संस्थान यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी नथुराम बाबा केहाळकर यांच्या कृपाशिर्वादाने जोगवाडा ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा २६ जून रोजी निघणार आहे़
या दिंडीचे उद्घाटन रामप्रसाद घोडके यांच्या हस्ते होणार आहे़ २६ जून रोजी जोगवाडा येथून पंढरपूरकडे पायी दिंडी जाणार आहे़ २६ रोजी सेलू येथे मुक्कामी जाणार आहे़ २७ रोजी पाथरी, २८ रोजी पवारवाडी, २९ रोजी तेलगाव, ३० रोजी तांबवा, १ जुलै रोजी सातेफळ, २ रोजी मस्सा, ३ रोजी धानोरा दगडी, ४ रोजी खांडवी, ५ रोजी उखळाई, ६ रोजी आष्टी, ७ ते १२ जुलै दरम्यान पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे़ जोगवाडा, पांढरगळा, सोनापूर, राजेगाव, सोस, भांबरी, वडाळी, वरुड नृसिंह, साखरतळा, जाब, मालेगाव, हातनूर, भोसी, चांदज, पांगरी, येसेगाव, मातला, केहाळ, निरवाडी, सालेगाव, सायखेडा, हलवीरा, मानकेश्वर, राजा, दाभा, घोडके पिंप्री आदी गावांतील भाविक या दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत़ या दिंडीमध्ये वारकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ह़भ़प़ रमेश महाराज, साहेबराव गुरुजी, शंकरराव मस्के, ज्ञानेश्वर महाराज डाके, बालासाहेब महाराज ठोंबरे, भगवान महाराज डासाळकर, अरुण महाराज घोडके, ह़भ़प़ दिनकर महाराज, ह़भ़प़ देवीदास महाराज शेवाळे, ह़भ़प आश्रोबा महाराज कवडे आदींनी केले आहे़ (प्रतिनिधी)
२५ जून रोजी रात्री ९ वाजता पालखी प्रस्थाननिमित्त ह़भ़प़ रमेश महाराज जोगवाडकर यांचे कीर्तन होणार आहे़ त्यानंतर हरिजागर होणार आहे़ २६ जून रोजी सकाळी ८ वाजता पालखीची पूजा करण्यात येणार आहे़ त्यानंतर दिंडी पंढरपूरकडे रवाना होणार आहे़ या पालखी सोहळ्यास काकडा, भजन, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर आदी कार्यक्रम होणार आहे़