काम न करता दिली बिले!
By Admin | Updated: February 3, 2015 01:00 IST2015-02-03T00:52:58+5:302015-02-03T01:00:14+5:30
औरंगाबाद : ग्रामीण भागातील विकासकामांसाठी मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात काम न केलेल्या कामांची बिले देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

काम न करता दिली बिले!
औरंगाबाद : ग्रामीण भागातील विकासकामांसाठी मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात काम न केलेल्या कामांची बिले देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
याबाबत सविस्तर तपशील असा की, जि. प. प्रशासनाने मुख्यालयात असलेल्या कँटीनच्या डागडुजीसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. तब्बल ३० लाख रुपयांचे हे काम एका मर्जीतील बेरोजगार संस्थेला देण्यात आले. कँटीनमध्ये संबंधित कंत्राटदाराने एकूण १९ प्रकारची वेगवेगळी कामे करणे अपेक्षित होते. त्यातील पाच मोठी कामेच करण्यात आलेली नाहीत. यात फरशी बसविणे, काँक्रीट करणे, स्ट्रक्चरल स्टीलची उभारणी, भिंतीला प्लास्टिक पेंट, छत गळती रोखण्यासाठी कोबा करणे आदी कामांचा यात समावेश आहे.
कंत्राटदाराला बिले अदा करताना एकूण १८ कामे करण्यात आल्याची नोंद अधिकाऱ्यांनी मोजमाप पुस्तिकेत केली आहे.