दुबईत नोकरीचे आमिष; दाम्पत्याने घातला गंडा
By Admin | Updated: March 26, 2016 00:56 IST2016-03-26T00:25:50+5:302016-03-26T00:56:44+5:30
औरंगाबाद : दुबईला मॉलमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका जोडप्याने नागरिकांना पावणेआठ लाखांचा गंडा घातला. एप्रिल २०१५ मध्ये हा प्रकार घडला.

दुबईत नोकरीचे आमिष; दाम्पत्याने घातला गंडा
औरंगाबाद : दुबईला मॉलमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका जोडप्याने नागरिकांना पावणेआठ लाखांचा गंडा घातला. एप्रिल २०१५ मध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी जोडप्याविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोशनगेट येथील खालेदबीन सईद (रा. करीम कॉलनी) याची एप्रिल २०१५ मध्ये शेख शकील शेख भिकन व त्याची पत्नी आयेशा शकील शेख यांच्यासोबत ओळख झाली होती. शकीलने खालेदबीन यांची दुबई येथे ओळख असून, त्याठिकाणी मॉलमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखविले होते. त्याने दाखवलेल्या आमिषाला बळी पडलेल्या खालेदबीन व त्यांच्या नातेवाईकांनी शकीलला पावणेआठ लाख रुपये दिले. रक्कम हातात पडल्यानंतर नोकरी देण्याबाबत जोडप्याने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खालेदबीन व इतरांनी दोघांना रक्कम परत मागितली. रक्कम परत मिळविण्यासाठी तगादा लावल्यानंतर शकील व आयेशाने विष प्राशन करून आत्महत्येची धमकी दिली. खालेदबीन यांनी पोलिसांत तक्रार दिल्याने दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.