घराचे कुलूप तोडून पळविले दागिने

By Admin | Updated: March 4, 2016 23:34 IST2016-03-04T23:30:47+5:302016-03-04T23:34:47+5:30

परभणी : घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ३५ हजार रुपये चोरून नेल्याची घटना शहरातील पार्वतीनगरात घडली. ३ मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आला.

Jewelry to be broken by the lock of the house | घराचे कुलूप तोडून पळविले दागिने

घराचे कुलूप तोडून पळविले दागिने

परभणी : घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ३५ हजार रुपये चोरून नेल्याची घटना शहरातील पार्वतीनगरात घडली. ३ मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आला.
पार्वतीनगर भागातील रहिवासी भगवान लक्ष्मण चोपडे (५८) यांचे कुटुंबीय २८ फेब्रुवारी रोजी बाहेरगावी गेले होते. चोपडे कुटुंबीय ३ मार्च रोजी घरी परतले. यादरम्यान चोरट्यांनी चोपडे यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व १० हजार रुपयांचे चांदीचे दागिने लांबविले. ज्यामध्ये सोन्याची अंगठी (३ ग्रॅम), लॉकेट (१ ग्रॅम), कानातले (१ ग्रॅम), नथनी (४ ग्रॅम), रिंग (दोन ग्रॅम), जोडवे (१ ग्रॅम), चांदीचे बाजुबंद (१० तोळे), चैन (१० तोळे), वाळे (४ तोळे) व अन्य साहित्य लांबविले. एकूण ३५ हजार रुपयांचे दागिन्यांची चोरी झाली आहे. भगवान चोपडे यांच्या फिर्यादीवरुन नवा मोंढा पोलिस ठाण्यात ४ मार्च रोजी गुन्हा नोंद झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर तरोन्ने तपास करीत आहेत. १० दिवसांत या परिसरातील चोरीची ही दुसरी घटना आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Jewelry to be broken by the lock of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.