रोख रकमेसह दागिने पळविले

By Admin | Updated: August 10, 2015 00:57 IST2015-08-10T00:52:28+5:302015-08-10T00:57:41+5:30

उस्मानाबाद : शहरातील काकडे प्लॉट परिसरात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले़ ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास

Jewelery packed with cash | रोख रकमेसह दागिने पळविले

रोख रकमेसह दागिने पळविले


उस्मानाबाद : शहरातील काकडे प्लॉट परिसरात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले़ ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास उस्मानाबाद शहरातील काकडे प्लॉट परिसरात घडली़
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, उस्मानाबाद शहरातील काकडे प्लॉट भागात राहणारे मोहनराव दत्तात्रय देशपांडे हे कुटुुंबियांसह पुणे येथे गेले होते़ देशपांडे यांच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोंडा, कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला़ घरातील लोखंडी कपाटात ठेवलेल्या रोख २२ हजार रूपयांसह १० ग्रॅम सोनं, चांदीची भांडी असा ऐवज घेवून चोरट्यांनी पोबारा केला़ ही घटना देशपांडे घराकडे परतल्यानंतर समोर आली़ घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला़ याबाबत मोहनराव देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शहरामध्ये दहशत
उस्मानाबाद शहराच्या विविध भागात मागील काही दिवसांपासून चोरटे आल्याच्या अफवा पसरत आहेत़ त्यामुळे विविध भागातील युवक रात्र जागून काढत आहेत़ तर काकडे प्लॉट भागात रविवारी सकाळी चोरीची घटना घडल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे़ त्यातच रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तेरणा टी पॉइंटजवळ चोरटे आल्याची माहिती पोलिसांना नागरिकांनी दिल्यानंतर पोलीस घटनास्थळाकडे रवाना झाले.

Web Title: Jewelery packed with cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.